ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:50 AM2018-09-17T09:50:54+5:302018-09-17T09:51:34+5:30
रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न पुन्हा भंगले. बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार मानावी लागली.
मुंबई : रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकचे सुवर्णस्वप्न पुन्हा भंगले. बेलारूस येथे सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत साक्षीला अंतिम फेरीत हार मानावी लागली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या पूजा धांडाने 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
आशियाई स्पर्धेतील अपयश मागे टाकून साक्षीने मेदवेद स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तिने उपांत्य फेरीत अजरबैजानच्या एलमिरा गैमबारोवाचा 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, जेतेपदाच्या लढतीत तिला अपयश आले. हंगरीच्या मारियाना सॅस्टीनने 6-2 अशा फरकाने साक्षीला पराभूत केले.
57 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत पूजाने 10-0 अशा फरकाने अमेरिकेच्या केल्सी कॅम्बेलचा पराभव करून भारताच्या खात्यात एक पदक जमा केले.
Congratulations to @SakshiMalik for winning a SILVER in 62 kg category & @poojadhanda0007 for clinching a BRONZE in 57 kg category at Medved International #Wrestling tournament in Minsk, Belarus. We are proud of you!🎉#SAI#TOPSAthlete@FederationWrest#KheloIndia🇮🇳🥈🥉🤼♀️ pic.twitter.com/I2rQGhsVnW
— SAIMedia (@Media_SAI) September 16, 2018