हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार; खूनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:27 PM2021-05-13T16:27:32+5:302021-05-13T16:29:14+5:30

दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सुशील कुमारचा ( Sushil Kumar) चा शोध दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.

Olympic medalist Sushil Kumar hiding in the Haridwar ashram of a 'big yoga guru' | हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार; खूनाचा गुन्हा दाखल

हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार; खूनाचा गुन्हा दाखल

Next

दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सुशील कुमारचा ( Sushil Kumar) चा शोध दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येचा गुन्हा सुशीलवर नोंदवला गेला आहे आणि दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार सुशील हरिद्वार येथील मोठ्या योग गुरूच्या आश्रमात लपला आहे. दिल्ली पोलिसांना याबाबची माहिती मिळाली आहे. (  Sushil Kumar is allegedly hiding from the world in a renowned Yoga Guru's Ashram in Haridwar) 

जागरणनं दिलेल्या माहितीनुसार रोहतक येथे राहणारा सुशीलचा जवळचा मित्रा भुरा यानं दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुशीलची काहिची प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुरा हा सुशीलच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो सुशीलचा बिझनेस सांभाळत होता, परंतु काही वर्षांपूर्वी सुशीलनं त्याच्याकडून सर्व जबाबदारी काढून घेत, त्याला दूर केले. त्यानंतर ही जबाबदारी सुशीलनं अजय व भुपेंद्र यांच्याकडे सोपवली. भुपेंद्र हा फरिदाबाद येथे राहणार आहे आणि फरिदाबाद येथे त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  


 
सुशील कुमारची कामगिरी
सुशील कुमारनं २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते, त्यानंतर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्यपदकाची कमाई केली. २०१०च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकले. २०१०, २०१४ व २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्या नावावर सुवर्णपदकं आहेत.

Web Title: Olympic medalist Sushil Kumar hiding in the Haridwar ashram of a 'big yoga guru'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.