'लग्नाआधी सेक्स नाही', ओलिम्पिकपटूनं लिहिली इमोशनल पोस्ट; केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:07 AM2022-05-20T10:07:05+5:302022-05-20T10:55:50+5:30
लोकांच्या कमेंट्स आणि रिलेशनशिपमुळे त्रस्त झालेल्या अमेरिकन अॅथलीट लोलोने इंस्टाग्रामवर पोस्ट करत, लोक आपल्याला एका पोस्टमुळे सातत्याने ट्रोल करत असल्याचे म्हटले आहे. खरे तर, तीने लग्नानंतरच सेक्स करण्याचा निर्णय घेतल आहे.
प्रसिद्ध ऑलिम्पिकपटू आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावलेल्या लोलो जोन्सची (Lolo Jones) एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नापूर्वी सेक्स न करण्याच्या आपल्या निर्णयामुळे, लोक आपल्याला ट्रोल करत असल्याचे लोलोने म्हटले आहे. एवढेच नाही, तर 8 महिने एका व्यक्तीशी बोलल्यानंतर आपण त्याला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने म्हटले आहे.
लोकांच्या कमेंट्स आणि रिलेशनशिपमुळे त्रस्त झालेल्या अमेरिकन अॅथलीट लोलोने इंस्टाग्रामवर पोस्ट करत, लोक आपल्याला एका पोस्टमुळे सातत्याने ट्रोल करत असल्याचे म्हटले आहे. खरे तर, तीने लग्नानंतरच सेक्स करण्याचा निर्णय घेतल आहे.
39 वर्षीय ओलिम्पिक हर्डलर आणि बॉब्सलॅडर लोलो जोन्सने इंस्टाग्रामवर एक नोट पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लोलो लिहिते, मी आज एका अशा मुलाला ब्लॉक केले आहे, ज्याच्यासोबत मी गेल्या 8 महिन्यांपासून बोलत होते. कारण मी त्याला आणखी सहन करू शकत नाही. तो मला सारखे मिक्स्ड सिग्नल देत असतो. तो लग्ना आणि मुलांसंदर्भातच बोलत असतो. पण तो मला फ्रेंड झोनमध्येच ठेवतो. तो मला भेटण्यासाठी कधी वेळही काढत नाही. मला प्रचंड अस्वस्थ वाटत आहे.
जोन्सन पुढे लिहिते, मी डेटिंग लाइफमुळे अत्यंत त्रस्त झाले आहे. मी देवाकडे प्रार्थना करत एका चांगला मुलगा मागत आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून रडत देवाकडे एक चांगला पती मिळावा, अशी मागणी करत आहे.
आपल्या फिलिंग्ससंदर्भात लिहिताना जोन्स म्हणते, की मी लग्न करावे, अशी त्याची इच्छा नसेल, तर त्यानेही माझी लग्नासंदर्भातील इच्छा संपूष्टात आणावी, अशी प्रार्थनाही आपण देवाकडे केली आहे. पण जसजशी वर्षे जात आहेत, माझ्या मनातील लग्नाची इच्छा तेवढीच तीव्र होत चालली आहे. मलाही एक कुटुंब हवे आहे.
जोन्स पुढे म्हणते, पुरुष मला सोडत राहतात. कारण मी लग्नापूर्वी सेक्स न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुले मला थेट मेसेज करून म्हणतात, की मी म्हातारी होत आहे. म्हणूनच मी रडत आहे. देवा तू कुठे आहेस? मी देवाकडे एकच मागणं मागते, की त्याने माझी इच्छा पूर्ण करावी. एकपेक्षा दोन बरे, असं आपणच म्हणताना.