Tokyo Olympic : कृतज्ञ मीराबाई चानू; उपकाराचे पांग फेडले, १५० हून अधिक ट्रक चालक व त्यांच्या साहाय्यकांना तिनं गौरविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 04:43 PM2021-08-06T16:43:22+5:302021-08-06T16:43:43+5:30
Olympic Silver Medallist Mirabai Chanu टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं तिच्या या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं तिच्या या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिचा जीवन प्रवास पाहिल्यास इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने किती खस्ता खाल्ल्या होत्या हे दिसून येईल. या काळात तिला अनेकांनी मदतही केली. अशाच एकेकाळी तिला मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा मीराबाईनं सत्कार केला. हे ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत नेत असत.
बजरंग लढला, पण 'सुवर्ण'शर्यतीतून बाहेर पडला, कांस्यपदकासाठी खेळावे लागणार
मीराबाई चानूचे कुटुंब अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगत होते. चानूच्या प्रशिक्षणावर होणारा रोजचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. चानूच्या घरापासून प्रशिक्षण केंद्र ३० किमी लांब होते. तिथे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात. हे पैसे पुरेसे नसत. असा परिस्थितीत चानूने एक मार्ग शोधून काढला होता. ती तिच्या घराजवळून जाणाऱ्या ट्रक ड्रायवरांकडे लिफ्ट मागत असे. त्यावेळी तिच्या मनात संकोच आणि भीती असे. मात्र धीर करून ती ट्रकमधून कोचिंग सेंटरमध्ये जात असे. काही दिवसांनंतर हे ट्रक ड्रायव्हरही तिला ओखळू लागले होते. तसेच तिचे घर जवळ येताच ते लांबूनच हॉर्न वाजवत असत. त्यामुळे चानूला वेळीच तयार होऊन ट्रकपर्यंत पोहोचता येत असे.
काही दिवसांनंतर चानू आणि ट्रक ड्रायव्हर्समध्ये एक वेगळ्याच प्रकारचे नाते निर्माण झाले. हे ट्रक ड्रायव्हर तिच्याकडून कधीही भाड्याचे पैसे घेत नसत. त्यामुळे जे पैसे तिला प्रवासखर्चासाठी मिळत, त्यामध्यमातून चानू सरावादरम्यान, काही खाद्यपदार्थांची खरेदी करत असे. आज त्याच ट्रक ड्रायव्हर्सना मीराबाईनं तिच्या घरी बोलावले अन् त्यांना टी शर्ट, मनीपूरी स्कार्फ आणि जेवायला दिलं. NDTV नं असे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या ड्रायव्हर्सना भेटल्यावर मीराबाई भावनिक झाली होती.
Olympiad @mirabai_chanu home was more than 25 km from the Sport Academy. No means of transport during those days, except trucks which carried river sands to the City. These truck drivers gave her lift everyday. Today she rewarded these truck drivers. pic.twitter.com/9WegUkwjkz
— Naorem Mohen (@laimacha) August 5, 2021
२६ वर्षीय मीराबाईनं ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.