दक्षिण अफ्रिकेच्या जंगलातून आॅलिम्पिकच्या मैदानावर : अॅना लाइॅँग
By admin | Published: August 11, 2016 08:26 AM2016-08-11T08:26:15+5:302016-08-11T08:27:29+5:30
खेळातील महत्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण सिध्द करणारी एक ५७ वर्षीय महिला आॅलिम्पिकच्या मैदानावरचं नाट्य टिपत आहे
Next
> दक्षिण अफ्रिकेच्या जंगलातून आॅलिम्पिकच्य मैदानावर : ५७ वर्षीय अॅना लाइॅँग
शिवाजी गोरे
रिओ दि जानेरो, दि. ११ - दक्षिण अफ्रिकेच्या जंगलात आवड म्हणून सुरू झालेल्या फोटोग्राफीला खेळांची आवड निर्माण झाली. खेळातील महत्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण सिध्द करणारी एक ५७ वर्षीय महिला आॅलिम्पिकच्या मैदानावरचं नाट्य टिपत आहे. सोमवारी पहाटेपासूनच पाऊस सुरू होता. जीतु रायची महत्वाची स्पर्धा पाहण्यासाठी बसने जात होती. यावेळी कॅमे-याची मोठी ब्रिफकेस, स्टॅँड असा सर्व लवाजमा असलेली एक महिला दिसली. तील थोडी बॅग उचलण्यासाठी मदत करून बसायला जागा दिल्यानंतर बोलायला सुरूवात झाली अन् दक्षिण अफ्रिकेच्या अॅना लाइॅँग यांचा सगळा प्रवास उलगडत गेला. ५७ व्या वर्षीही तरुणांना लाजेल अशा उत्साहात मैदानावर वावरण्यामागची जिद्द त्यांनी सांगितली.
अॅना म्हणाल्या, ‘‘ दक्षिण आफ्रिकातील पिचेरीया गावात मी रहात हाते. आमच्या गावात शहरातील एका शाळेची सहल आली होती. त्या मुलांकडे मी कॅमरा पाहिला आणि मला मोठे कुतुहल वाटले, याच्या सहाय्याने फोटो काढले जातात. त्यामुळे मला सुध्दा लहान पाणापासून फोटोग्राफीचा छंद होता. जसजशी मोठी होते गेले तसतसे माझी आवड वाढत गेली. साधा कॅमरा घेऊन जंगलात फोटो काढायला जावू लागले. शिक्षणासाठी भावाकडे येऊन केपटाऊनमध्ये विधी शाखेत प्रवेश घेऊन अभ्यास सुरु केला. यावेळी उदारनिर्वाहासाठी केप टाईम्स वृत्तपत्र विकत होते. त्यातील फोटो दररोज पाहायचे आणि आपणही फोटोग्राफी करावी असे वाट लागले. यासाठी एक कॅमेरा घेतला आणि क्रिकेट, रग्बी, फुटबॉल मैदानावर भटकू लागले. एके दिवशी केप टाईम्सचा फोटोग्राफर आजारी पडला. मी सरळ मैदानावर जाऊन फोटो काढले आणि सरळ आॅफीसला जाऊन दिले. संपादकांनी ते पाहिले आणि थक्कच झाले. येथूनच माझ्या फोटोग्राफीच्या कारकिर्दीला सुरूवात झाली. ’’
१९८३ मध्ये अॅना केपटाईम्सच्या चिफ फोटोग्राफर आणि १९९६ मध्ये फिचर एडीटर झाल्या. पण स्पोर्टस फोटोग्राफीच्या पॅशनमुळे त्यांना एकाच ठिकाणी बांधून राहणे आवडले नाही. फ्री लान्सर म्हणून त्यांनी केवळ स्पोर्टस फोटोग्राफीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ऑलिम्किपपासून विविध स्पर्धा त्या कव्हर करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘एन्जॉयींग लाईफ’..