आॅलिम्पिक रंगणार झगमगाटाविना
By admin | Published: September 23, 2015 10:59 PM2015-09-23T22:59:09+5:302015-09-23T22:59:09+5:30
पुढील वर्षी रंगणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी यजमान या नात्याने ब्राझील जोमाने तयारी लागले आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी आ वासून उभा आहे
रियो डी जेनरो : पुढील वर्षी रंगणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी यजमान या नात्याने ब्राझील जोमाने तयारी लागले आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी आ वासून उभा आहे. सध्या आर्थिक टंचाईतून जात असलेल्या ब्राझील सरकारने आॅलिम्पिक आयोजनमध्ये वायफळ खर्च टाळण्यावर कटाक्षाने भर देताना स्पर्धा उद्घाटन आणि समारोप समारंभामध्ये अतिरीक्त झगमगाट नसेल, असा निर्णय घेतला आहे.
आॅस्कर नामांकन मिळवलेल्या सिटी आॅफ गॉड चित्रपटाचे दिग्दर्शक फर्नांडो मेरेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली रिओ आॅलिम्पिकची तयारी सुरु आहे. याबाबतीत फर्नांडो यांनी सांगितले की, सध्या ब्राझील अर्थिक अडचणीतून जात असून सर्वांनाच याविषयी कल्पना आहे. आमचे बजेट लंडनपेक्षा खुप कमी आहे. गत आॅलिम्पिक स्पर्धेत मोठ्याप्रमाणात आर्थिक उधळपट्टी झाली होती. सध्या मिळालेल्या बजेटमध्ये काम करण्यात मी समाधानी आहे. त्याचवेळी स्पर्धेच्या समारोप समारंभाचे दिग्दर्शक लियोनार्डो केईतानो यांनी सांगितले की, मर्यादित बजेट असूनही त्याचा आम्ही आयोजनावर फारसा प्रभाव पाडू देणार नाही. हा समारोह टीव्हीच्या माध्यमातून पाहणाऱ्या सुमारे तीन अरबहून अधिक लोकांना भावेल. त्याचप्रमाणे आम्ही आयोजित करणाऱ्या कार्यक्रमामध्ये झगमगाट नसेल मात्र वास्तविकता नक्की असेल. कमी खर्चामध्ये हा कार्यक्रम आम्ही रचनात्मक आणि आकर्षक करु, असेही लियोनार्डो म्हणाले. (वृत्तसंस्था)