'दिलदार' BCCI... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रिडापटूंना दिली ८.५० कोटींची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 07:41 PM2024-07-21T19:41:42+5:302024-07-21T19:42:13+5:30

Paris Olympics 2024, Jay Shah BCCI: खुद्द BCCI सचिव जय शाह यांनी याबद्दलची घोषणा केली आहे

Olympics 2024 BCCI to provide 8.50 Crore to IOA as Financial Support for Indian Athletes says Jay Shah | 'दिलदार' BCCI... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रिडापटूंना दिली ८.५० कोटींची मदत!

'दिलदार' BCCI... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रिडापटूंना दिली ८.५० कोटींची मदत!

Paris Olympics, Jay Shah BCCI: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या आठवड्यापासून पॅरिसमध्ये सुरू होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडूंचा संघ विक्रम मोडून पदक जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. या दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कडून त्यांना मदत देण्यात आली आहे. बीसीसीआयने ऑलिम्पिक मोहिमेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) ८.५० कोटी रुपयांचे सहाय्य दिले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले जय शाह?

जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की BCCI पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या सर्वोत्तम खेळाडूंना पाठिंबा देत आहे. आम्ही या मोहिमेसाठी (ऑलिम्पिक) IOA ला ८.५० कोटी रुपये देत आहोत.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने या वर्षी जूनमध्ये T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघ आणि सपोर्टिंग स्टाफला १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले होते. १५ खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आले. द्रविडने केवळ अडीच कोटी रुपये घेतल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Olympics 2024 BCCI to provide 8.50 Crore to IOA as Financial Support for Indian Athletes says Jay Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.