ओम समर्थ संघाचे विजेतेपद

By Admin | Published: March 7, 2017 04:20 AM2017-03-07T04:20:42+5:302017-03-07T04:20:42+5:30

सरस्वती स्पोटर््स क्लबला ६-५, ६-५ असे नमवून मुंबई जिल्हा खो-खो स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपदाला गवसणी घातली.

Om Samarth Samaj wins | ओम समर्थ संघाचे विजेतेपद

ओम समर्थ संघाचे विजेतेपद

googlenewsNext


मुंबई : ओमसमर्थ भारत व्यायाम मंदिर संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात सरस्वती स्पोटर््स क्लबला ६-५, ६-५ असे नमवून मुंबई जिल्हा खो-खो स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपदाला गवसणी घातली. दुसरीकडे, महिला गटात शिवनेरी सेवा मंडळाने गतविजेत्या श्रीसमर्थ व्यायाम मंदिर संघावर ३-२, १-१ अशी मात करुन बाजी मारली.
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि शिवशंकर उत्सव मंडळाच्या वतीने लोअर परळ येथील ललित कला भवनच्या मैदानात या स्पर्धेच्या थरार पार पडला. पुरुष अंतिम सामन्यात ओम समर्थच्या विलास कारंडेने दोन्ही डावात नाबाद संरक्षण केले. विलासला अभिषेक काटकर (१:५०, १:४० मिनिटे व ३ गडी), प्रयाग कनगुटकर यांची साथ मिळाल्याने ओम समर्थने वर्चस्व राखले. सरस्वती क्लबच्या श्रीकांत वल्लाकटी (२:१०, २ मि. व आक्रमणात २ गडी), सुशील दहिंबेकर (२:४० व २ गडी) यांनी अपयशी झुंज दिली.
महिला गटात शिवनेरी संघाने श्रीसमर्थ संघाचा ४-३ (३-२, १-१) असा तब्बल साडे सात मिनिटे राखून पराभव केला. शिवनेरीच्या दर्शना सकपाळने ५.२० व नाबाद ६.१० मिनिटे दमदार संरक्षण करत छाप पाडली. प्रत्युत्तरात श्री समर्थच्या अनुष्का प्रभूने ४.३५ मिनिटांचे लक्षवेधी संरक्षण केले. मात्र अन्य खेळाडूंची अपेक्षित साथ न मिळाल्याने गतविजेत्या श्री समर्थला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)
>स्पर्धेतील वैयक्तिक विजेते
सर्वोत्कृष्ट संरक्षक-
अभिषेक काटकर (ओम समर्थ ), अनुष्का प्रभु (श्री समर्थ)
सर्वोत्कृष्ट आक्रमक -
प्रसाद पाथडे (सरस्वती),
शिवानी गुप्ता (शिवनेरी)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू -
विलास कारंडे (ओम समर्थ),
दर्शना सकपाळ (शिवनेरी)

Web Title: Om Samarth Samaj wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.