अभिमानास्पद ; शूजवर हातानं लिहायची Adidas; आता तोच ब्रँड Hima Dasसाठी बनवतो 'खास' शूज!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:30 PM2020-04-27T15:30:04+5:302020-04-27T15:30:49+5:30
आयुष्यात कधी काय घडेल, याचा अंदाज कुणीही बांधू शकत नाही. पण, आपल्या प्रामाणिकपणे आपल्या स्वप्नांचा पाठलाग कराल, तर काहीच अशक्य नाही.
आसामच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या हिमा दासनं ते करून दाखवलं आहे. आज संपूर्ण जग तिला ओळखतं. भारताच्या अॅथलेटिक्स विश्वाची ती एक पोस्टर गर्ल आहे. अथक परिश्रमाच्या जोरावर हिमानं स्वतःचं नाव क्रीडा विश्वावर नोंदवलं आहे. भारताची सुवर्णकन्या अशी तिनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण, भारताच्या या युवा धावपटूकडे एकेकाळी घालण्यासाठी चांगले शूजही नव्हते. ती शूजवर Adidas लिहून धावायची आणि आता तोच ब्रँड हिमाच्या नावाचे खास शूज तयार करत आहे.
डेव्हिड वॉर्नरची 'बनवाबनवी'; पत्नीचा स्वीम सूट घालून TikTok Video
इंस्टाग्रामवर भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाशी चर्चा करताना हिमानं हे सांगितले. ती म्हणाली,'' सुरुवातीला मी अनवाणी पायानेच धावायची. मी पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला तेव्हा माझ्या वडीलांनी मला स्पाइकचे साधे शूज विकत घेऊन दिले. पण, त्यावर मी स्वतः Adidas असे लिहीले होते. भविष्यात काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. आता Adidas माझ्या नावाचे शूज तयार करत आहेत.''
हिमानं 2018मध्ये फिनलँड येथे झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तिनं 400 मीटर शर्यतीत बाजी मारली होती आणि या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली होती. त्यानंतर जर्मनीच्या कंपनीनं तिची सदिच्छादूत म्हणून निवड केली. कंपनीनं तिच्या गरजेनुसार शूज तयार केली आणि त्यावर एका बाजूला हिमाचं नाव लिहिलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...
KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य
युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!
फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू मागतोय माफी; म्हणतो दुसरी संधी द्या...
आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो!; 'कॉफी विथ करण' वादावर Hardik Pandya म्हणतो...