वन-डे रँकिंग

By admin | Published: September 1, 2014 08:00 PM2014-09-01T20:00:21+5:302014-09-01T20:00:21+5:30

टीम इंडिया पुन्हा नंबर वन

One Day Ranking | वन-डे रँकिंग

वन-डे रँकिंग

Next
म इंडिया पुन्हा नंबर वन
वन-डे रँकिंग : आफ्रिकेची दुसर्‍या क्रमांकावर घसरण
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेत २-० ने आघाडी मिळविणार्‍या टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे़ यामुळे दक्षिण आफ्रिकेची दुसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे़
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वन-डे रँकिंगमध्ये भारताने ११४ गुण मिळविताना अव्वल क्रमांकावर ताबा मिळविला़ दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ११३ गुण जमा आहेत़ हा संघ दुसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे, तर श्रीलंका संघ १११ गुणांसह तिसर्‍या स्थानावर विराजमान आहे़
रविवारी झालेल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेकडून मात खावी लागली होती़ यामुळे ऑस्ट्रेलिया संघ ताज्या क्रमवारीत १११ गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे़ लंका आणि ऑस्ट्रेलियाचे गुण समान असले तरी दशांश गुणांच्या आधारे लंका संघाची बाजू वरचढ आहे़ दरम्यान, ऑस्ट्रेलियावरील विजयामुळे झिम्बाब्वे संघ १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे़
भारतीय संघाला आपला अव्वलचा ताज कायम राखण्यासाठी इंग्लंडविरुद्धचे दोन्ही वन-डे सामने जिंकावे लागणार आहेत, तसेच अन्य संघांच्या सामन्यातील परिणामामुळेही भारताच्या रँकिंगवर परिणाम होऊ शकतो़
इंग्लंडने जर पुढच्या दोन्ही वन-डेत भारतावर विजय मिळविला आणि हरारेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर कांगारू संघ पुन्हा आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होईल़
आयसीसीने जाहीर केलेली क्रमवारी :
१़ भारत, २़ दक्षिण आफ्रिका, ३़ श्रीलंका, ४़ ऑस्ट्रेलिया, ५़ इंग्लंड, ६़ पाकिस्तान, ७़ न्यूझीलंड, ८़ वेस्ट इंडीज, ९़ बांगलादेश, १०़ झिम्बाब्वे, ११़ अफगाणिस्तान, १२़ आयर्लंड़

Web Title: One Day Ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.