भारत आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार वन-डे मालिका
By admin | Published: July 10, 2015 02:01 AM2015-07-10T02:01:25+5:302015-07-10T02:01:25+5:30
वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलिया आणि भारत पुढील वर्षी १२ जानेवारीपासून पाच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना पर्थ येथे खेळवला जाईल
मेलबोर्न : वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलिया आणि भारत पुढील वर्षी १२ जानेवारीपासून पाच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना पर्थ येथे खेळवला जाईल.
नव्या द्विपक्षीय करारानुसार भारतीय संघ आता कसोटी आणि वनडे मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा वेगवेगळा दौरा करणार आहे.
भारतीय संघ तीन आठवड्यांच्या दौऱ्यावर पाच वनडे आणि तीन टी-२0 सामन्यांची मालिका खेळेल. हा दौरा १२ ते ३१ जानेवारी २०१६दरम्यान आहे. यादरम्यान सामने मेलबोर्न, सिडनी, पर्थ, अॅडलेड आणि ब्रिस्बेन येथे खेळवले जातील. (वृत्तसंस्था)
------------
वनडे मालिकेचे
वेळापत्रक पुढीलप्रमाणे
१२ जानेवारी : पहिला वनडे (पर्थ)
१५ जानेवारी : दुसरा वनडे (ब्रिस्बेन)
१७ जानेवारी : तिसरा वनडे (मेलबोर्न)
२० जानेवारी : चौथा वनडे (कॅनबेरा)
२३ जानेवारी : पाचवा वनडे (सिडनी)
--------------
टी-२० सामने
२६ जानेवारी : पहिला टी-२० (ओव्हल)
२९ जानेवारी : दुसरा टी-२० (मेलबोर्न)
३१ जानेवारी : तिसरा टी-२० (सिडनी).