‘फायनल’साठी एक विजय : कोहली
By admin | Published: May 22, 2015 12:52 AM2015-05-22T00:52:00+5:302015-05-22T00:52:00+5:30
राजस्थान रॉयल्सला ७१ धावांनी पराभूत केल्यानंतर आता एक विजय त्यांना ‘फायनल’मध्ये पोहोचवू शकतो, असे म्हटले आहे.
पुणे : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा कर्णधार विराट कोहली याने इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सला ७१ धावांनी पराभूत केल्यानंतर आता एक विजय त्यांना ‘फायनल’मध्ये पोहोचवू शकतो, असे म्हटले आहे.
आरसीबीने बुधवारी विजयाबरोबरच दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये स्थान मिळवले. आता त्यांचा सामना २२ मे रोजी रांची येथे चेन्नई सुपरकिंग्ज संघाशी होणार आहे.
आरसीबीने एबी डिव्हिलियर्स (६६) आणि मनदीपसिंग (नाबाद ५४) यांच्यातील तिसऱ्या गड्यासाठीच्या ११३ धावांच्या भागीदारीमुळे ४ बाद १८0 अशी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर हर्षल पटेल (१५ धावांत २ बळी), युजवेंद्र चहल (२0 धावांत २ बळी), श्रीनाथ अरविंद (२0 धावांत २ बळी) व डेव्हिड वाइसी (३२ धावांत २ गडी) यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल्सला १0९ धावांत
गारद केले.
दुसरीकडे रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने आज काहीही त्यांच्या बाजूने नसल्याचे म्हटले. स्मिथ म्हणाला, ‘‘या सामन्यात बऱ्याचशा बाबीत आमच्याकडून चुका झाल्या. आम्ही सुरुवात चांगली केली; परंतु दरम्यानच्या षटकांत आम्ही लय कायम ठेवू शकलो नाही. डिव्हिलियर्स आणि मनदीप यांनी सुरेख फलंदाजी केली. १६0 हा स्कोर पाठलाग करण्यासारखा होता; परंतु त्यांनी त्यापेक्षा जास्त धावा केल्या. स्पर्धेच्या अंतिम सत्रात आम्ही चांगल्या लयीत नव्हतो, असे मला वाटते.’’ (वृत्तसंस्था)
सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘‘आता कोणताही उपांत्यपूर्व फेरीचा सामना राहिला नाही. पुढील लढत उपांत्य फेरीसारखी आहे. २0१३ मध्ये आम्ही पात्र ठरलो नव्हतो त्याची खंत वाटत होती. आम्ही गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा चांगले खेळलो. आता एक विजय आम्हाला फायनलमध्ये पोहोचवू शकतो. एक कर्णधार म्हणून मी खूप खूष आहे.’’
आजच्या सामन्याविषयी कोहली म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे म्हटले, तर सात षटकांनंतर मलाही आम्ही प्रथम गोलंदाजी करायला हवी होती, असे वाटले होते; परंतु इॅबी जगातील सर्वोत्तम फलंदाज
आहे हे आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. मनदीपनेही शानदार खेळी केली.’’