ओएनजीसीने विजेतेपद राखले

By admin | Published: January 20, 2015 12:17 AM2015-01-20T00:17:40+5:302015-01-20T00:17:40+5:30

आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना १०व्या सॅव्हीओ चषक आॅल इंडिया बासेक्टबॉल स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद राखताना सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली.

ONGC retained the title | ओएनजीसीने विजेतेपद राखले

ओएनजीसीने विजेतेपद राखले

Next

मुंबई : गतविजेत्या बलाढ्य ओएनजीसी संघाने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना १०व्या सॅव्हीओ चषक आॅल इंडिया बासेक्टबॉल स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद राखताना सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली. अंतिम सामन्यात इंडियन ओवरसीज बँक (आयओबी) संघाचे आव्हान ६३-५३ असे परतावून लावताना ओएनजीसीने आपले वर्चस्व सिद्ध केले.
डॉन बॉस्को शाळेच्या बास्केटबॉल कोर्टवर पार पडलेल्या या अंतिम सामन्यात ओएनजीसीने सावध सुरुवात करताना बचावात्मक पवित्रा घेतला. पहिल्या उपांत्य सामन्यात ओएनजीसीने आयओबीला नमवले होते. तरीदेखील ओएनजीसीने कुठेही ढिलाई न ठेवताना विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या क्वार्टरमध्येच १९-५ अशी मोठी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट करणाऱ्या ओएनजीसीने मध्यांतराला ३१-१६ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले.
मध्यांतरानंतरच्या खेळामध्ये आयओबीने झुंजार खेळ करीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या व चौथ्या क्वार्टरमध्ये बँकेने ओएनजीसीच्या तुलनेत चांगला खेळ करीत सामना चुरशीचा केला. मात्र पहिल्या सत्रातील मोठी आघाडी निर्णायक ठरवत ओएनजीसीने सहजपणे विजेतेपद निश्चित केले. ओएनजीसीकडून विशेष भृगवंशी याने सर्वाधिक १७ गुण नोंदवताना निर्णायक खेळ केला. अनुप एम. यानेदेखील १० गुण मिळवताना विशेषला चांगली साथ दिली. त्याचवेळी दुसऱ्या सत्रात प्रसन्ना वेंकटेश (११), अमरज्योत (१०) आणि मिहिर पांड्ये (१०) या त्रिकूटाने झुंजार खेळ करताना आयओबीचा पराभव लांबवण्याचा अपयशी प्रयत्न केला.
तत्पूर्वी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय विजेत्या छत्तीसगडने चमकदार खेळ करताना पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढ्य दक्षिण रेल्वेला ७१-६३ असे नमवून आपला हिसका दाखवला.
तत्पूर्वी महिला गटात पूनम चतुर्वेदीने केलेल्या निर्णायक खेळाच्या जोरावर छत्तीसगड संघाने गतविजेत्या बलाढ्य दक्षिण रेल्वेला ७१-६३ असा धक्का शानदार विजेतेपद पटकावले. रेल्वेने पहिल्या दोन क्वार्टरमध्ये जोरदार धडक मारताना मध्यांतराला ३३-२९ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले. मध्यांतरानंतर मात्र छत्तीसगडने आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली. पूनमने वेगवान चाली करीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना आपल्या जवळपासदेखील फिरकू दिले नाही. छत्तीसगडने एकहाती वर्चस्व राखताना अखेर गतविजेत्या दक्षिण रेल्वेला ७१-६३ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)

वैयक्तिक विजेते
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू :
पुरुष : रियाझुद्दिन (ओएनजीसी)
महिला : सरनजीत कौर (छत्तीसगड)
लक्षवेधी खेळाडू : पूनम चतुर्वेदी (छत्तीसगड)
अंतिम सामन्यातील
सर्वोत्कृष्ट खेळाडू :
पुरुष : विशेष भृगवंशी (ओएनजीसी)
महिला पूनम चतुर्वेदी (छत्तीसगड)

Web Title: ONGC retained the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.