ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ आजपासून, आनंदकडे भारताचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:58 PM2020-05-04T23:58:00+5:302020-05-05T06:50:08+5:30

जगातील सहा संघांचा यात समावेश असून विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा अपवाद वगळता अन्य सर्वच दिग्गज खेळणार आहेत. चीनला अव्वल मानांकन देण्यात आले आहे

Online Nations Cup Chess from today, India's lead to Anand | ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ आजपासून, आनंदकडे भारताचे नेतृत्व

ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ आजपासून, आनंदकडे भारताचे नेतृत्व

Next

चेन्नई : पाच वेळेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हा आज मंगळवारपासून सुरू होत असलेल्या ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. करोनामुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि चेस डॉट कॉमने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जगातील आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत.

जगातील सहा संघांचा यात समावेश असून विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा अपवाद वगळता अन्य सर्वच दिग्गज खेळणार आहेत. चीनला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पाठोपाठ युरोप, रशिया, अमेरिका, भारत आणि शेष विश्व अशी क्रमवारी देण्यात आली. पाचवे मानांकन लाभलेल्या भारतीय संघात आनंदसह विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, बी. अधिबान, कोनेरू हम्पी आणि डी. हरिकाचा समावेश आहे. माजी विश्वविजेता ब्लादिमिर क्रामनिक भारतीय संघाचा सल्लागार आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या चीनच्या संघात डिग लीरेन, वांग हाओ, वेई यी आणि चारवेळेचा विश्व विजेता हाऊ यिफान याचा समावेश आहे. स्पर्धेत १८०,००० डॉलर बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. युरोपियन संघाचे नेतृत्व गॅरी कास्पारोव करणार आहे. अलेक्झांडर मोटलेव याच्याकडे रशियाचे आणि जॉन डोनाल्डसन याच्याकडे अमेरिकेचे नेतृत्व सोपविण्यात आले. अर्कडी ड्वोकोंविच हा शेष विश्व संघाचे नेतृत्व करेल. विश्वविजेती हम्पी म्हणाली, ‘रॅपिड स्वरूप असल्यामुळे लढती अत्यंत चुरशीच्या होतील.’ एका संघाकडून तीन पुरुष आणि एक महिला खेळाडू खेळणार असून, दुहेरी राऊंड रॉबिन लढती होणार आहेत. 

Web Title: Online Nations Cup Chess from today, India's lead to Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.