राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू

By Admin | Published: August 12, 2016 08:58 PM2016-08-12T20:58:00+5:302016-08-12T20:58:21+5:30

युवा कल्याण आणि केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते आरएफवायएस राष्ट्रीय फूटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

Online registration for the National School Football Championship | राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू

राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12-  युवा कल्याण आणि केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते आरएफवायएस राष्ट्रीय फूटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांतील संघांची आॅनलाईन नोंदणी सुरु झाली असून मंगळवार १६ आॅगस्ट पर्यंतच संघांना स्पर्धेत नोंदणी करता येणार आहे.
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी शालेय स्तरावर ज्युनियर मुले (इयत्ता ७ वी ते १० वी), सिनिअर मुले (इयत्ता ११ ते १२) आणि सिनिअर मुली (इयत्ता ११ ते १२) तर महाविद्यालयांसाठी पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम करणाऱ्या मुलांसाठी एक गट अशा स्वरुपात स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला व्यावसायिक फुटबॉल क्लबकडून प्रशिक्षण देणार आहे. त्याचबरोबर अजिंक्यपद मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना शिष्यवृत्ती देखील प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात चेन्नई, मुंबई, कोची, कोलकाता, गोवा, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.

 

Web Title: Online registration for the National School Football Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.