आयपीएल ‘प्रसारण’साठी खुली निविदा
By Admin | Published: September 19, 2016 04:04 AM2016-09-19T04:04:14+5:302016-09-19T04:04:14+5:30
‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’च्या प्रसारणाच्या अधिकारांसाठी खुली निविदा प्रक्रियेची घोषणा केली.
नवी दिल्ली : ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’च्या प्रसारणाच्या अधिकारांसाठी खुली निविदा प्रक्रियेची घोषणा केली. लोढा समितीच्या पारदर्शीतेबाबतच्या शिफारशींनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘‘बीसीसीआय ‘आयपीएल’कडून वैश्विक मीडिया अधिकार टीव्ही आणि डिजिटलसाठी निविदा प्रक्रियेची घोषणा करते.’’
यावेळी आयपीएलचे मीडिया अधिकार सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाकडे आहेत. मात्र, हा करार आयपीएलच्या पुढील स्पर्धेनंतर संपेल. सोनी नेटवर्ककडे बोर्डाला प्रस्ताव देण्याचा पहिला अधिकार होता. २००८ मध्ये विश्व स्पोर्टस् ग्रुपमध्ये आयपीएलचे प्रसारण हक्क ९१.८० कोटी डॉलरमध्ये १० वर्षांसाठी विकत घेतले होते. यात मल्टीस्क्रीन मीडिया प्रायव्हेटने सोनीला अधिकृत प्रसारक बनवण्याच्या करारावर सही केली होती. हा करार २००९ आयपीएलच्या आधी दुसऱ्यांदा करण्यात आला होता. त्यात ‘मल्टीस्क्रीन’ने बीसीसीआयसोबत ९ वर्षांसाठी एक अरब ६३ कोटी डॉलरचा करार केला होता.