सिनेतारकांच्या उपस्थितीत उद्घाटन
By admin | Published: April 7, 2015 04:04 AM2015-04-07T04:04:16+5:302015-04-07T04:04:16+5:30
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आठव्या सत्राचे उद््घाटन मंगळवारी प्रसिद्ध सिनेअभिनेता हृतिक रोशन, शाहिद कपूर, सिनेतारका अनुष्का शर्मा यांच्या
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आठव्या सत्राचे उद््घाटन मंगळवारी प्रसिद्ध सिनेअभिनेता हृतिक रोशन, शाहिद कपूर, सिनेतारका अनुष्का शर्मा यांच्या रंगारंग कार्यक्रमाने होत आहे.
गेल्या वर्षी आयपीएलच्या आयोजनावरून वादंग निर्माण झाला होता. तसेच २०१३ सालची स्पर्धा स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे यंदा कोणत्याही विवादाविना स्पर्धा पार पाडण्याचे आव्हान आयोजकांसमोर असले. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य अनावश्यक बाबींची चर्चा अथवा वादविवाद उत्पन्न होऊ नयेत, यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन पक्के प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले होते. मात्र या हंगामात सनराइजर्स हैदराबाद संघाकडून दोघे एकाच ड्रेसिंगरूममध्ये बसताना दिसतील. भारतात पुढील वर्षी टी-टष्ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विश्वचषक संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी खेळाडूंचा प्रयत्न राहील. भारताचे वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान या अनुभवी खेळाडूंसाठी संघात पुनरागमन करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.