Oppo ने लॉन्च केली भारतीय क्रिकेट टीमची नवी जर्सी

By admin | Published: May 4, 2017 04:53 PM2017-05-04T16:53:59+5:302017-05-04T18:39:53+5:30

मुंबईतील कार्यक्रमात कंपनीने भारतीय क्रिकेट टीमची नवी जर्सी लॉन्च केली.

Oppo launches Indian cricket team's new jersey | Oppo ने लॉन्च केली भारतीय क्रिकेट टीमची नवी जर्सी

Oppo ने लॉन्च केली भारतीय क्रिकेट टीमची नवी जर्सी

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - चिनची मोबाइल निर्माती कंपनी OPPO ने आज आपला नवा स्मार्टफोन F3 लॉन्च केला. यासोबतच मुंबईतील कार्यक्रमात कंपनीने  भारतीय क्रिकेट टीमची नवी जर्सीदेखील लॉन्च केली.  OPPO ने भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजकत्व मिळवलं आहे. 
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सीईओ राहुल जोहरी आणि Oppo चे प्रेसिडेंट स्काय ली यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या नव्या जर्सीला लॉन्च केलं.  
 
चिनची मोबाइल निर्माती कंपनी OPPO मोबाइलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत करार केला आहे. पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. बीसीसीआय आणि OPPO मध्ये 538 कोटींपेक्षा जास्तचा करार झाल्याचं वृत्त आहे.  
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रायोजक स्टार इंडियाने दुस-यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला होता. स्टारसोबत 1 जानेवारी 2014 ला करार झाला होता. 31 मार्चला हा करार संपला.  डिसेंबर 2013 मध्ये सहाराची स्पॉन्सरशिप संपल्यानंतर स्टार भारतीय संघाचे  मुख्य स्पॉन्सर बनले होते.
 
 
का लावली नाही स्टारने बोली?
बीसीसीआय आणि आयसीसीमधील संबंध कटू होत असून भविष्यात त्याचा खेळावर परिणाम होईल असं स्टार इंडियाचे सीईओ उदय शंकर म्हणाले होते. त्यामुळेच दुस-यांदा बोली न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.  
 
यापुर्वी डिजीटल मार्केटिंगमधील अनेक कंपन्यांनी  स्पॉन्सरशीप घेण्याची तयारी दाखवली होती असं वृत्त आहे. स्पॉन्सरशीप घेण्यासाठी पेटीएम, रिलायन्स जिओ आणि आयडिया सेल्यूलर या कंपन्यांची इच्छा होती असं वृत्त याआधी आलं होतं.  

Web Title: Oppo launches Indian cricket team's new jersey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.