आव्हानांसह संधीसुद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 01:22 AM2016-05-23T01:22:43+5:302016-05-23T01:22:43+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी अनेक उपाययोजना केल्याचे सांगतानाच
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी अनेक उपाययोजना केल्याचे सांगतानाच, ‘या वेळी अनेक आव्हाने असून त्याचबरोबर संधीही आहेत’ असा विश्वास व्यक्त केला. शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन सचिव ठाकूर यांच्याकडे नवा अध्यक्ष म्हणून पाहिले जात होते आणि रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत ठाकूर यांच्या नावाची अध्यक्षपदी औपचारिक घोषणा झाली.
बीसीसीआयचे सर्वांत तरुण अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोर्डाच्या पुढील वाटचाली व उपाययोजनांची माहिती दिली. या वेळी ठाकूर यांनी आपल्या आधीचे तीन अध्यक्ष जगमोहन दालमिया, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांचे नाव घेऊन या तिघांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबाबत स्वत:ला नशीबवान म्हटले.
लोढा समितीच्या शिफारसीबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘कोणतीही संस्था परिपूर्ण नसते. शिवाय बीसीसीआयने याआधीच व्यवहारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली आहेत. लोढा समितीच्या अंतिम निकालाची आम्ही वाट पाहणार नसून क्रिकेटच्या भल्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व पूर्ण करण्यासाठी बोर्ड सक्षम आहे. तसेच, कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी देखील उपक्रम राबवणार आहोत. शालेय विद्यार्थ्यांना कसोटी सामने पाहता यावे, यासाठी स्टेडियममध्ये कमीत कमी १० टक्के तिकिटे त्यांच्यासाठी आरक्षित करणार आहेत,’’ असेही ठाकूर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, ‘‘देशात पर्यावरणपूरक स्टेडियम उभारण्यासाठी ‘ग्रीन स्टेडियम’ अंतर्गत १०० कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे. हा निधी वर्षभरात सध्या अस्तित्वात असलेल्या स्टेडियमवर खर्च करण्यात येईल. त्यात सोलर पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग या सुविधा उभारण्यावर भर असेल. तसेच मान्यताप्राप्त अंध, अपंग क्रिकेटसाठी पाच वर्षांत पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,’’ अशी माहितीही ठाकूर यांनी या वेळी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)रविवारी मुंबईत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठाकूर यांनी आपल्या सचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकूर यांच्या अध्यक्षपदाच्या अर्जावर उत्तर विभागातील सर्व सहा संघटनांनी हस्ताक्षर केले. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्या नावाची या वेळी बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाली. बीसीसीआय आणि डीडीसीएचे उपाध्यक्ष सी. के. खन्ना यांनी आपल्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या एसजीएममध्ये ठाकूर यांच्या नावाची औपचारिक घोषणा करून त्यांना अध्यक्षपदी विराजमान केले.ठाकूर यांची आश्वासने
आम्ही कमीत कमी १० टक्के तिकिटे विद्यार्थी, मुली आणि विशेष विकलांग व्यक्तींसाठी आरक्षित ठेवू.
देशातील अनेक मैदानांतील आसनांना क्रमांक देण्यात न आल्याने अनेक अडचणी होत आहेत. त्यामुळे लवकरच या आसनांना क्रमांक देण्यात येतील.
विशेष विकलांग व्यक्तींसाठी विशेष कक्ष तयार करण्यात येईल.
पर्यावरणाचा विचार करता एनर्जी आॅडिट करण्यात येईल. सोलर पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि ट्रीटेड सीवेज वॉटर यांचा कशा प्रकारे वापर करण्यात येईल यावर चर्चा होईल आणि एका वर्षात या गोष्टी लागू करण्यात येतील. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.
माहिती, संभाषण आणि तंत्रज्ञान यांचा कशा प्रकारे वापर केला जाऊ शकेल यावर लक्ष देण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व राज्य संघटनांना सोशल नेटवर्किंगवर अपडेट राहण्यास सांगण्यात येईल.
भारताच्या राष्ट्रीय संघाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत नंबर वन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
सर्वांत युवा अध्यक्ष..
अनुराग ठाकूर यांच्या नावाची अध्यक्षपदी घोषणा झाल्यानंतर बीसीसीआयमध्ये नवा ‘विक्रम’ नोंदवला गेला. आजपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविलेल्यांपैकी ४१ वर्षींय ठाकूर सर्वांत युवा अध्यक्ष म्हणून बीसीसीआयला मिळाले आहेत.
प्रशिक्षकासाठी जाहिरात...
टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाबाबत अध्यक्षांनी सांगितले की, या पदासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत. यासाठी १० जूनपर्यंत आवेदन देण्याची शेवटची मुदत आहे. आगामी झिम्बावे दौऱ्यासाठी २९ मेपर्यंत कोचिंग स्टाफ
निवडण्यात येईल.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी लगेच एक जाहिरात देण्यात येईल आणि १० जूनपर्यंत यासाठी उत्सुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. महिला क्रिकेटमध्ये सुधारण्यासाठी पावले उचलण्यात येतील आणि महिलांच्या सामन्यांची संख्याही वाढवण्यात येईल. मूकबधिर आणि अंध क्रिकेटला प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्या प्रगतीसाठी ५ करोड रुपये देण्यात येईल. कमी वेळेत सर्व आयोजन करून वेगळ्या ठिकाणी सामने खेळविण्यात आल्याबद्दल आयपीएलचे अभिनंदन.
> लोकमतचे भाकीत खरे
‘बीसीसीआयच्या सचिवपदी अजय शिर्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब’ हे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिद्ध केले होते. रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत याची घोषणा अनुराग ठाकूर यांनी केली.
>अनुराग ठाकूर हे तरुण आणि अनुभवी अध्यक्ष आहेत. त्यांना क्रिकेट विषयाची चांगली जाण आहे. शिवाय क्रिकेटला मोठे करण्यासाठी त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे. लोढा समितीचा अंतिम निकाल अद्याप आलेला नसल्याने त्यावर भाष्य करणे तूर्तास तरी योग्य ठरणार नाही. बीसीसीआय सगळ्या आव्हानांना तोंड देण्यास समर्थ आहे. देशात येणारा काळ हा बीसीसीआयचा पारदर्शक काळ म्हणून ओळखला जाईल.
- अजय शिर्के (सचिव, बीसीसीआय)
>बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष म्हणून आर. ग्रांट गोव्हन यांनी १९२८-२९, १९३२-३२ या कार्यकाळात काम पाहिले. त्यानंतर २९ अध्यक्ष बीसीसीआयला मिळाले. त्यातील चर्चेत राहिलेले शेवटचे पाच अध्यक्ष.
‘किंग आॅफ कमबॅक’
म्हणून ओळख निर्माण केली.बीसीसीआयला अधिक व्यावसायिक रुप देण्याचा प्रयत्न केला. १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पुन: प्रवेशाचा प्रस्ताव मांडला होता आणि त्याच वर्षी आफ्रिकेचा भारताविरुद्धचा तीन एकदिवसीय सामन्यांचा दौराही निश्चित केला. १९७०च्या निलंबनानंतर आफ्रिका संघ
प्रथमच खेळला त्यावेळी एक लाख चाहत्यांनी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर गर्दी केली होती. यामुळे आफ्रिकेवरील बंदही हटविण्यात आली. राजकारणाबरोबरच क्रिकेटही पवारांचे आवडीचे क्षेत्र.
२९ नोव्हेंबर २००५ रोजी अध्यक्षपदी निवड झाली. मुंबई क्रिकेट संघटनेवरही त्यांनी बरेच अधिराज्य गाजविले. क्रिकेटला व्यावसायिकतेची जोड देण्याचा अभिनव प्रयोग पवारांनीच केला. आयपीएलसारखी संकल्पना यशस्वी करण्यामागेही पवारांचा वाटा आहे. १९८० मध्ये सचिवपदावर कार्यरत. पाच वर्षे कारभार. १९८७ मध्ये विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय संघाचे व्यवस्थापकीय जबाबदार उत्कृष्टपणे पार पाडली. हरयाणा क्रिकेट संघटनाही मोठ्या उमेदीने चालविली. २००१ मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.व्यवसायाने वकील असलेल्या शशांक मनोहर यांची २९ वे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांची ज्यावेळी निवड झाली तेव्हा भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करीत २०११चा विश्वचषक पटकाविला होता. त्यामुळे मनोहर यांच्या आयुष्यातील हा संस्मरणीय क्षण होता. एक स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शी कारभाराबाबत मनोहर यांचे नाव आघाडीवर आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकणानंतर दुसऱ्यांदा मनोहर यांना संधी देण्यात आली होती.व्यावसायिक असलेल्या
एन. श्रीनिवासन यांचे नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अधिक चर्चेत आले. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने त्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडण्याचे आदेश दिल होते. त्यांना ९ नोव्हेंबर २०१५ रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदावरुनही हटविण्यात आले होते. त्यामुळे एन. श्रीनिवासन यांची क्रिकेट क्षेत्रातील प्रतिमा डागाळलेली गेली.