मला सिध्द करण्याची संधी : रोहित
By Admin | Published: October 30, 2014 01:19 AM2014-10-30T01:19:32+5:302014-10-30T01:19:32+5:30
संघाबाहेर असणो कायमच वेदनादायक असते. एकप्रकारचे मानसिक त्रण यामुळे येते. मात्र, दुखापतग्रस्त असल्याने काही करू शकत नाही.
रोहित नाईक - मुंबई
संघाबाहेर असणो कायमच वेदनादायक असते. एकप्रकारचे मानसिक त्रण यामुळे येते. मात्र, दुखापतग्रस्त असल्याने काही करू शकत नाही. त्यासाठी पूर्ण मेहनतीने तंदुरुस्ती सिद्ध करणार असून, श्रीलंकेविरुद्ध होणा:या सराव सामन्यात मी स्वत:ला सिद्ध करणार असल्याचे भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याने खास ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बोटाचे फ्रॅक्चर आणि खांदा दुखापतींमुळे संघाबाहेर असलेला रोहित शर्मा सध्या पुनरागमनासाठी सज्ज असून, गुरुवारी होणा:या श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाकडून खेळणार आहे. या सामन्याद्वारे राष्ट्रीय निवडकत्र्याना आपली दखल घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार रोहितने केला आहे. या पाश्र्वभूमीवर त्याने ‘लोकमत’ सोबत दिलखुलास गप्पा मारल्या.
तंदुरुस्तीनंतर पहिलाच सामना श्रीलंका विरुद्ध खेळणार असल्याने याबाबत रोहितने सांगितले, की दुखापतीमुळे मी 2 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होतो. आता पूर्णपणो फीट असून, लंकेविरुद्धच्या सराव सामन्यातून मला जे काही साध्य करायचे आहे ते मी नक्की साध्य करेल. त्याचबरोबर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) हे मुंबईतील माङो आवडते मैदान आहे. त्यामुळे या मैदानावर श्रीलंकेसारख्या बलाढय़ संघाशी खेळायला मी खूप उत्सुक असून, याहून चांगली बाब अजून काय असू शकेल, असेही रोहितने या वेळी सांगितले.
फिटनेससाठी कसा वेळ दिला, यावर रोहितने सांगितले, की गेल्या 1क् दिवसांपासून नेट प्रॅक्टिसला कसून सुरुवात केली आहे. त्याअगोदर शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. मध्यंतरी मिळालेल्या रिकामा वेळ कुटुंब, तसेच मित्रपरिवारासोबत घालवल्याने मानसिक तणाव बराच कमी झाला आणि आता वेळ आहे ती क्रिकेट खेळण्याची.
भारत ‘अ’ संघाने याआधी वेस्ट इंडीज संघाविरुद्ध विजयी कामगिरी केली. गुरुवारी लंकेविरुद्ध संघ कशी कामगिरी करणार, यावर बोलताना रोहित म्हणाला, की सध्या ‘अ’ संघातील सर्वच खेळाडू राष्ट्रीय संघात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे प्रत्येकाकडून सवरेत्तम खेळ करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळेच लंकेविरुद्धदेखील हा संघ नक्कीच यशस्वी कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
या सराव सामन्यात रोहितची कामगिरी नक्कीच चांगली होईल. 2क्11 सालचा विश्वचषक स्पर्धेत दुखापतीमुळे त्याला खेळता आले नव्हते. मात्र, आता त्याने स्वत:ला पूर्णपणो तयार केले असून, श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात तो 1क्क्} यशस्वी कामगिरी करेल.
- दिनेश लाड, रोहित शर्माचे प्रशिक्षक
कित्येक वर्षापासून धोनी भारताचे नेतृत्व करीत आहे. त्याचा अनुभव सर्वानाच उपयोगी असतो. नक्कीच त्याची कमी या मालिकेत जाणवेल. तरीदेखील इतर खेळाडूसुद्धा प्रतिभावान असल्याने धोनीची कसर ते नक्की भरून काढतील. शिवाय सर्वच खेळाडू आणि खास करून विराट कोहलीवर सर्वात जास्त जबाबदारी असेल. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक कामगिरीवर फोकस करावा, त्या जोरावरच संघ जिंकेल.