आॅरेंज कॅप केवळ औपचारिकता

By admin | Published: May 29, 2016 12:28 AM2016-05-29T00:28:40+5:302016-05-29T00:28:40+5:30

शानदार नेतृत्वक्षमतेच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाला आयपीएलच्या नवव्या सत्रात अंतिम फेरी गाठून देणारा स्टार फलंदाज विराट कोहली आॅरेंज कॅपचा मानकरी ठरण्यासाठी

Orange Cap Only Formality | आॅरेंज कॅप केवळ औपचारिकता

आॅरेंज कॅप केवळ औपचारिकता

Next

बेंगळुरू : शानदार नेतृत्वक्षमतेच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाला आयपीएलच्या नवव्या सत्रात अंतिम फेरी गाठून देणारा स्टार फलंदाज विराट कोहली आॅरेंज कॅपचा मानकरी ठरण्यासाठी आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. विराट आत आयपीएलच्या एका मोसमात एक हजार धावा फटकावण्याचा विक्रम नोंदवण्यास उत्सुक आहे.
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला मिळणाऱ्या आॅरेंज कॅपच्या शर्यतीत विराट ९१९ धावांसह सर्वांत आघाडीवर आहे. विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला सनराझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने आतापर्यंत ७७९ धावा फटकावल्या आहे. तो विराटपेक्षा १४० धावांनी पिछाडीवर आहे. रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत या दोन्ही फलंदाजांचा खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
विराट यंदा टी-२० क्रिकेटमध्ये शानदार फॉर्मात आहे. त्याने आयपीएलमध्येही कामगिरीत सातत्य राखले. विराटने १५ सामन्यांत ८३.५४ च्या सरासरीने आणि १५१.९० च्या स्ट्राईक रेटने ९१९ धावा फटकावल्या आहेत. त्यात चार शतके व सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट अंतिम लढतीत ८१ धावा फटकावत आयपीएलच्या इतिहासात एका पर्वात एक हजार धावा फटकावणारा जगातील पहिला फलंदाज म्हणून विक्रम नोंदवण्यास उत्सुक आहे तर वॉर्नर त्याला पिछाडीवर सोडत आॅरेंज कॅपचा मान मिळवण्यास प्रयत्नशील आहे. काही चमत्कार घडला तरच वॉर्नरला ही कॅप पटकावता येईल. कारण विराट शून्यावर बाद झाला तरी त्याला पिछाडीवर सोडण्यासाठी वॉर्नरला १४१ धावांची खेळी करावी लागेल आणि सध्याच्या घडीला हे शक्य वाटत नाही. वॉर्नरने १६ सामन्यांत ५९.९२ च्या सरासरीने आणि १४९.२३ च्या स्ट्राईक रेटने ७७९ धावा फटकावल्या आहेत. त्यात आठ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेंगळुरूचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने १५ सामन्यांत ५६.८३ च्या सरासरीने ६८२ धावा फटकावल्या आहेत. आयपीएलच्या नवव्या पर्वात अंतिम लढतीत विराट गृहमैदानावर खेळणार असल्यामुळे त्याचे पारडे वरचढ भासत आहे. चिन्नास्वामी मैदानावर विराटचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित असतील. दरम्यान, हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने यंदाच्या मोसमात स्वत:ला सिद्ध केले असून संघाला अंतिम फेरी गाठून दिली. उभय संघांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे जेतेपद पटकावून देण्याची उभय संघांच्या कर्णधारांवर मोठी जबाबदारी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Orange Cap Only Formality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.