ऑरेंज कॅप विजेते
By admin | Published: April 8, 2015 05:56 PM2015-04-08T17:56:49+5:302015-04-08T18:11:25+5:30
आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा बोलबाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणा-या ख्रिस गेलने सलग दोन पर्वात ऑरेंज कॅप पटकावण्याचा विक्रम रचला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. प्रत्येक सामन्यात ही कॅप त्याच्या नव्या मालकाच्या शोधात असते. आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा बोलबाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणा-या ख्रिस गेलने सलग दोन पर्वात ऑरेंज कॅप पटकावण्याचा विक्रम रचला आहे.
टी - २० सामन्यांमध्ये फलंदाजांसाठी अच्छे दिन आले असून आयपीएलमध्येही याचीच झलक बघायला मिळते. सर्वच फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅप पटकावण्यासाठी चढाओढ सुरु असते. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार व एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. ख्रिस गेलने आत्तापर्यंत ६८ सामन्यांमध्ये १९२ षटकार ठोकले आहेत. तर २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना ख्रिस गेलने ६६ चेडूंमध्ये १७५ धावांची तडाखेबाज खेळी केली होती. यामध्ये १७ षटकारांचा समावेश होता. एका डावात एकाच फलंदाजाने ऐवढे षटकार ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती.
सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणा-या फलंदाजांमध्ये गौतम गंभीर व अमित मिश्रा पहिल्या स्थानावर आहेत. गौतम गंभीर १०४ सामन्यांमध्ये तर अमित मिश्रा ८६ सामन्यांमध्ये १० वेळा शून्यावर बाद झाला आहे.
वर्ष | खेळाडू | संघ | सामने | एकूण धावा | सर्वोच्च धावा | शतक | अर्धशतक | सरासरी | चौकार | षटकार |
२०१४ | रॉबिन उथप्पा | कोलकाता नाईट रायडर्स | १६ | ६६० | नाबाद ८३ | ० | ५ | ४४. | ७४ | १८ |
२०१३ | माइक हसी | चेन्नई सुपर किंग्ज | १७ | ७३३ | ९५ | ० | ६ | ५२.३५ | ८१ | १७ |
२०१२ | ख्रिस गेल | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | १५ | ७३३ | नाबाद १२८ | १ | ७ | ६१.०८ | ४६ | ५९ |
२०११ | ख्रिस गेल | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | १२ | ६०८ | १०७ | २ | ३ | ६७.५५ | ५७ | ४४ |
२०१० | सचिन तेंडुलकर | मुंबई इंडियन्स | १५ | ६१८ | नाबाद ८९ | ० | ५ | ४७.५३ | ८६ | ३ |
२००९ | मॅथ्यू हेडन | चेन्नई सुपर किंग्ज | १२ | ५७२ | ८९ | ० | ५ | ५२ | ६० | २२ |
२००८ | शॉन मार्श | किंग्स इलेव्हन पंजाब | ११ | ६१६ | ११५ | १ | ५ | ६८.४४ | ५९ | २६ |