ओसाका, ब्राडी उपांत्य फेरीत; ज्वेरेव व कारेनो बस्टा यांनी गाळला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:34 PM2020-09-09T23:34:50+5:302020-09-10T07:10:24+5:30

यूएस ओपन

Osaka, Brady in the semifinals; Sweat dripped by Zverev and Kareno Busta | ओसाका, ब्राडी उपांत्य फेरीत; ज्वेरेव व कारेनो बस्टा यांनी गाळला घाम

ओसाका, ब्राडी उपांत्य फेरीत; ज्वेरेव व कारेनो बस्टा यांनी गाळला घाम

googlenewsNext

न्यूयॉर्क : नाओमी ओसाका व जेनिफर ब्राडी यांनी सरळ सेट्समध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण पुरुष विभागात अलेक्सांद्र ज्वेरेव व पाब्लो कारेनो बस्टा यांना अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला.

जपानची खेळाडू व दोन ग्रँडस्लॅम जेतेपदाची मानकरी ओसाकाने दमदार कामगिरीच्या जोरावर अमेरिकेची ९३ वी मानांकित शेल्बी रोजर्सचा ६-३, ६-४ ने पराभव केला. त्याआधी, २७ वर्षीय रोजर्सने ओसाकविरुद्ध गेल्या तीन लढतींमध्ये सरशी साधली होती, पण या लढतीत तिने चुका करीत २७ गुण बहाल केले जर ओसाकाने केवळ ८ टाळण्याजोग्या चुका केल्या. दोन वर्षांपूर्वी यूएस ओपन जिंकणाऱ्या ओसाकाला उपांत्य फेरीत ब्राडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. अमेरिकेची २८ वी मानांकित ब्राडीने कजाखस्तानच्या २३ व्या मानांकित युलिया पुतिनसेवाचा ६-३, ६-२ ने पराभव केला. ब्राडीने बेसलाईनवरील खेळात वर्चस्व गाजवले. तिने पहिल्या सेटमध्ये ४-० तर दुसºया सेटमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती.

रम्यान, पुरुष विभागात पाचवे मानांकन प्राप्त जर्मन खेळाडू ज्वेरेवने क्रोएशियाच्या २७ व्या मानांकित बोर्ना कोरिचविरुद्ध १२ दुहेरी चुका आणि ४६ टाळण्याजोग्या चुका केल्या तरी १-६, ७-६ (५), ७-६(१), ६-३ ने विजय मिळवला. स्पेनचा २९ वर्षीय २० वा मानांकित कारेनो बस्टाने चार तासापेक्षा अधिक काळ संघर्षपूर्ण खेळ करीत कॅनडाच्या १२ व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हला ३-६, ७-६(५), ७-६(४), ०-६, ६-३ ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Osaka, Brady in the semifinals; Sweat dripped by Zverev and Kareno Busta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस