१४ नोव्हेंबरला आरोग्यासाठी आपलं पुणे सायक्लोथॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 06:26 AM2021-11-04T06:26:40+5:302021-11-04T06:27:14+5:30
आपलं पुणे सायक्लाेथाॅनसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक. सायकल चालवल्याने हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण सुधारते, तसेच वायूप्रदूषण आणि गर्दी होत नाही. हे उद्दिष्ट ठेवून मेगा सायकलिंग इव्हेंटचे म्हणजेच आपलं पुणे सायक्लोथॉन २०२१ चे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दैनंदिन प्रवासात कार, बाईकऐवजी सायकलचा वापर वाढावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, वाहतुकीचे सर्वांत कार्यक्षम मानवी-शक्तीचे साधन सायकल आहे. दैनंदिन आयुष्यात सायकल चालविल्याने आरोग्यात कसा फरक पडू शकतो? याची जाणीव नागरिकांना करून देणे आवश्यक आहे.
सायकल चालवल्याने हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण सुधारते, तसेच वायूप्रदूषण आणि गर्दी होत नाही. हे उद्दिष्ट ठेवून मेगा सायकलिंग इव्हेंटचे म्हणजेच आपलं पुणे सायक्लोथॉन २०२१ चे आयोजन केले आहे. हा सायकलिंग उपक्रम पोलीस आणि पब्लिक यांच्यातील इंटरफेस आहे. सायक्लोथॉनची सुरुवात भक्ती-शक्ती चौकातून होऊन समारोपही भक्ती-शक्ती चौक येथे होईल.
या सायक्लाेथाॅनसाठी लोकमत माध्यम प्रायोजक आहे. सायक्लोथॉन १४ नोव्हेंबरला होणार आहे. सायक्लोथॉनचा १०० किमीचा मार्ग हा भक्ती-शक्ती चौक-नाशिक फाटा-भक्ती शक्ती चौक-लोणावळा टोल नाका-भक्ती शक्ती चौक असा असेल. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सुमारे १५०० पोलीस या कार्यक्रमात सहभागी होतील. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका आयुक्त राजेश पाटील हे रेस डायरेक्टर म्हणून सहभागी होतील.
राइड - गैर-स्पर्धात्मक
(सर्व प्रकारच्या सायकल)
सर्व फिनिशर्समधील सर्व श्रेणींमध्ये
एकूण लकी ड्रॉ - २५ ब्रँडेड सायकल
१० किमी (फक्त मुले आणि मुली -
५ लकी ड्रॉ विजेते फिनिशरमधील -
एव्हॉन ब्रँडेड सायकल
२० किमी (फक्त महिलांसाठी - ४ लकी ड्रॉ विजेते महिला गटातील
फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)
२५ किमी (खुला प्रवर्ग - पुरुष आणि महिला गटातील ४ लकी ड्रॉ विजेते
फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)
५० किमी (खुला प्रवर्ग - पुरुष आणि महिला गटातील ४ लकी ड्रॉ विजेते
फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)
७५ किमी (खुला प्रवर्ग - पुरुष आणि महिला गटातील ४ लकी ड्रॉ विजेते
फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)
१०० किमी (खुला प्रवर्ग - ४ लकी
ड्रॉ विजेते पुरुष आणि महिला गटातील फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)
नोंदणीकृत सर्व सहभागींना मोफत मिळतील
n सायकलिंग जर्सी
n रंगीत फिनिशर्स पदक
n ई-टाइमिंग प्रमाणपत्र
n हेल्दी पॅक केलेला नाश्ता
n ऑन-रूट हायड्रेशन सेवा
n वैद्यकीय आणि फिजिओ सेवा
n अँटी-कोविड किट - मास्क आणि सॅनिटायझर.
n बॅक-अप व्हॅन सपोर्ट
n स्पोर्टी स्लिंग बॅग
n प्रायोजकाकडून विविध विशेष भेटवस्तू
n सर्व श्रेणीतील प्रथम क्रमांकांच्या स्पर्धकांना गार्मिन वॉच
n एकूण ५ लाखांची पारितोषिके वयोगटानुसार सर्व विजेत्या स्पर्धकांना विभागून देण्यात येतील.
n १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बक्षीस वितरण सोहळा होईल, त्यात सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.