आमचा आत्मविश्वास उंचावलेला आहे
By Admin | Published: January 31, 2017 04:36 AM2017-01-31T04:36:00+5:302017-01-31T04:36:00+5:30
सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला चेल्सीचा नवा कर्णधार गॅरी कॅहिल याच्या नेतृत्वाखाली संघाची जबरदस्त घोडदौड सुरू आहे. सन २०१२पासून संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या
- गॅरी कॅहिल लिहितो...
सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला चेल्सीचा नवा कर्णधार गॅरी कॅहिल याच्या नेतृत्वाखाली संघाची जबरदस्त घोडदौड सुरू आहे. सन २०१२पासून संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कॅहिलने चेल्सीचा चढता आलेख जवळून अनुभवला आहे. प्रीमियर लीग, एफए कप, चॅपियन्स लीग आणि युरोपा लीग या सर्व स्पर्धांचे प्रत्येकी एक विजेतेपद पटकावलेल्या चेल्सीमध्ये कॅहिलची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. सध्या कॅहिल आणखी एका दमदार विजयाचा भाग होण्यास सज्ज असून, प्रीमियर लीगमध्ये गुणतालिकेत अव्वल असलेले चेल्सी बलाढ्य लिव्हरपूलशी दोन हात करण्यास सज्ज आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे लिव्हरपूलला नमवण्यात यश आल्यास स्पर्धेचे जेतेपद जवळपास निश्चित करण्यात चेल्सी यशस्वी ठरेल. गतवर्षी १० व्या स्थानावर समाधान मानावे लागल्यानंतर चेल्सीने आश्चर्यकारक कामगिरी करताना यंदा थेट अव्वल स्थानी झेप घेतली. यामध्ये निर्णायक ठरले ते कॅहिलचे नेतृत्व...
प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात तुम्ही मोठी आघाडी घेतली असून, लिव्हरपूल अजूनही चेल्सीपासून १० गुणांनी मागे आहे. तसेच ही आघाडी आणखी वाढवण्याची संधीही आहे. काय सांगशील?
मलादेखील ही आघाडी वाढण्याची आशा आहे. सध्या तरी आमच्याकडे मजबूत आघाडी असून, ही आघाडी आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण, यानंतर आम्हाला आर्सेनालविरुद्धही खेळायचे आहे. हा आठवडा आमच्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे.
जेतेपद तुम्ही आतापासूनच गृहीत धरले आहे का? जर लिव्हरपूलला नमवले, तर तुम्ही जेतेपदाचे प्रबळ दावेदार बनाल...
खरं म्हणजे जेतेपद आताच गृहीत मानून न चालणे खूप महत्त्वाचे आहे. आम्हला सध्या केवळ आमच्या खेळावरच लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्या आम्हाला असे वाटत आहे, की आम्ही अपराजित राहू, आम्ही कठोर मेहनत घेत आहोत म्हणून हा आत्मविश्वास आहे. लिव्हरपूलविरुद्धचा सामना किती आव्हानात्मक आहे याची आम्हाला जाणीव आहे.
टॉटनहॅमविरुद्ध चेल्सीच्या खंडित झालेल्या विजयी मालिकेची खूप चर्चा झाली. यानंतर संघाची कामगिरी चांगली झाली. या पराभवानंतर तुम्ही चांगले पुनरागमन केल्याचे वाटते का?
माझ्या मते, हो, लिसेस्टरविरुद्धची आमची कामगिरी शानदार ठरली. टॉटनहॅमविरुद्धच्या पराभवानंतर आम्ही अपेक्षित असलेली कामगिरी करण्यात यशस्वी झालो. आता आम्हाला हेच सातत्य कायम राखायचे असून, प्रतिस्पर्धी संघामध्ये व अव्वल स्थानामध्ये मोठे अंतर ठेवायचे आहे.
मग, लिव्हरपूलविरुद्धच्या सामन्याकडे कसे पाहतोस?
आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. आमचा संघ मजबूत भासत असून, यासाठी आम्ही मेहनत घेतली आहे. शारीरिकदृष्ट्या आम्ही चांगल्या स्थितीत असून, आमचे महत्त्वाचे खेळाडू सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. आम्ही विजयासाठी पूर्ण योगदान देऊ आणि संघात जबरदस्त एकनिष्ठा देखील आहे.
दिएगो कोस्टाच्या बाबतीत अनेक चर्चा सुरूहोत्या. मिळालेल्या माहितीनुसार तो चीनला जाणार होता. चेल्सीसाठी दिएगो किती महत्त्वाचा आहे?
ओह, तो संघाचा शानदार खेळाडू आहे. या मोसमात सर्वांनी ते पाहिलेच आहे. त्याच्या पुनरागमनाने आणि त्याच्या कामगिरीने आम्ही आनंदी आहोत. काही घडलं तर त्यावरून
अनेक चर्चांना उधाण येते. तो केवळ
एक सामना खेळला नाही
आणि त्याच्याविषयी अनेक
चर्चा झाल्या. तो आमचा
महत्त्वाचा खेळाडू असून, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. (पीएमजी)