बोपन्ना बाहेर

By admin | Published: December 23, 2016 01:28 AM2016-12-23T01:28:38+5:302016-12-23T01:28:38+5:30

अमेरिकन ओपनचा माजी उपविजेता व दोन वेळेचा आॅलिम्पियन रोहन बोपन्ना हा न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात होणाऱ्या डेव्हिस

Out of Bopanna | बोपन्ना बाहेर

बोपन्ना बाहेर

Next

नवी दिल्ली : अमेरिकन ओपनचा माजी उपविजेता व दोन वेळेचा आॅलिम्पियन रोहन बोपन्ना हा न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीत खेळणार नाही. एआयटीएच्या निवड समितीने बोपन्नाला बाहेर केले असून लियांडर पेस आणि साकेत मिनेनी यांना पसंती दिली.
स्पेनविरुद्ध मागील डेव्हिस चषक सामन्यात राफेल नदाल आणि मार्क लोपेझ यांच्याविरुद्ध दोघांनीही चमकदार खेळ केला होता. उलट लियांडर आणि रोहनसोबत खेळले तेव्हा कामगिरी ढेपाळली हा अनुभव आहे.
बोपन्ना एटीपी पुरुष रँकिंगमध्ये २८, पेस ५९ आणि मिनेनी २१० व्या स्थानावर आहे. राष्ट्रीय निवडकर्ते मिश्रा म्हणाले, ‘रोहनला संघात ठेवले असते तर एकेरीच्या तिसऱ्या खेळाडूची निवड होऊ शकली नसती. लियांडरच्या सोबतीने साकेतने नेहमी चांगलाच खेळ केला आहे.’ लियांडर हा ४३ वर्षांचा असूनही ३६ वर्षांच्या रोहनच्या तुलनेत सरस खेळाडू असल्याकडे मिश्रा यांनी लक्ष वेधले.
सोमदेवबाबत मिश्रा म्हणाले, ‘दीर्घ काळापासून तो स्पर्धा खेळला नाही. त्याला कोर्टवर पुनरागमन करीत चांगला खेळ करावा लागेल.’
न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघात युकी भांबरीचे पुनरागमन झाले. मिनेनी तसेच रामकुमार रामनाथन हे दोघे संघात कायम आहेत. युकीचे आत येणे याचा अर्थ सुमित नागल संघाबाहेर होणे असा आहे. संघात पाचवा खेळाडू डावखुरा प्रजनेश गुणेश्वरन हा आहे. दोन युवा टेनिसपटू आदिल कल्याणपूर आणि नितीन कुमार सिन्हा हे संघासोबत सराव करीत असल्याने फार अनुभवी होणार आहेत.
महेश भूपती भारताचा नॉन प्लेअर कर्णधार
महान टेनिसपटू महेश भूपती हा भारतीय डेव्हिस चषक टेनिस संघाचा बिगर खेळाडू कर्णधार बनला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होणारी आशिया-ओसियाना ग्रुप-१ची लढत सध्याचा बिगर खेळाडू कर्णधार आनंद अमृतराज याची अखेरची लढत असेल.
४एआयटीए महासचिव हिरण्यमय चॅटर्जी म्हणाले, ‘प्रत्येकाला कर्णधार बनण्याची संधी मिळायला हवी. कुठलेही पद एका व्यक्तीसाठी नसते. मी महेशला विचारणा करताच त्याने पद स्वीकारण्याची तयारी दाखविली. आम्ही आनंदला विजयी निरोप देऊ इच्छितो.’ अमृतराज हे या निर्णयावर खूश आहेत काय, असे विचारताच ते म्हणाले, ‘कुणीही पदावरून पायउतार होऊ इच्छित नाही, पण प्रत्येकाला संधी मिळायलाच हवी.’
४खेळाडूंना याबाबत विश्वासात घेतले का, असा सवाल करताच ते म्हणाले, ‘आम्हाला खेळाडूंचा सल्ला घेण्याची गरज नाही. नेतृत्व कोणी करावे याबद्दल खेळाडूंना विश्वासात घेण्याचे कारण नाही. लियांडर पेस याला देखील आम्ही विचारणा केली नाही.’
४लियांडर आणि महेश यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. महेशला कर्णधार बनविल्यामुळे पेसचा पुढचा मार्ग थांबला असे मानायचे काय, असे विचारताच चॅटर्जी म्हणाले, ‘वेळ येताच त्यावर आम्ही निर्णय घेऊ. अमृतराज यांनी खेळाडूंना दिलेली मोकळीक ही देखील कारणीभूत असावी. एआयटीएच्या अधिकाऱ्यांनीही हे कारण फेटाळलेले नाही.’
४अमृतराज यांच्याबाबत ते म्हणाले, ‘बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, पण कुण्या एका खेळाडूला पाठिंब्याबाबत एकही पत्र आलेले नाही. सोमदेव देवबर्मन तसेच रमेश कृष्णन यांच्याकडूनही बिगर खेळाडू कर्णधार बनण्याची इच्छा जाहीर करण्यात आलेली नाही. भूपतीने देखील कुठलीही विशेष मागणी केलेली नाही. त्याला पारिश्रमिक देण्यासंदर्भात विचाराल तर डेव्हिस चषकासाठी देण्यात येणाऱ्या मानधनाची रक्कम त्याला निश्चित दिली जाईल.’

Web Title: Out of Bopanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.