मैदानाबाहेरील वादांचा कामगिरीवर परिणाम नाही - विराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:33 PM2017-07-19T15:33:21+5:302017-07-19T17:39:52+5:30

प्रशिक्षक निवड आणि मैदानाबाहेरील इतर वादांचा कामगिरीवर परिणाम होणार नसल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली याने श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले

Out-of-ground disputes do not affect the performance - Virat | मैदानाबाहेरील वादांचा कामगिरीवर परिणाम नाही - विराट

मैदानाबाहेरील वादांचा कामगिरीवर परिणाम नाही - विराट

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - प्रशिक्षक निवड आणि मैदानाबाहेरील इतर वादांचा कामगिरीवर परिणाम होणार नसल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली याने श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले. श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराटने हे वक्तव्य केले. श्रीलंका दौऱ्यात विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे.
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात झालेला वाद आणि त्यानंतर रवी शास्त्रीच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडीसाठी विराटने उघडपणे समर्थन दिले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत विराटवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्याला  उत्तर देताना विराट म्हणाला,"प्रशिक्षक निवड व इतर वादांचा माझ्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. माझ्या हातात बॅट आहे आणि त्याद्वारे चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मैदानाबाहेरील गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत."

Web Title: Out-of-ground disputes do not affect the performance - Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.