दुखापतग्रस्त स्टेन मालिकेतून ‘आऊट’
By admin | Published: November 5, 2016 05:40 AM2016-11-05T05:40:10+5:302016-11-05T05:40:10+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली
नवी दिल्ली- आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे स्टेन मालिकेतून ‘आऊट’ झाला आहे.
स्टेनच्या खांद्याचे स्कॅन्गििं करण्यात आले असून, फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले आहे. त्याला या मालिकेतून माघारी घ्यावी लागणार आहे. स्टेनने दुखापतीमुळे शुक्रवारी उपाहाराला ४२ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना मैदान सोडले.
स्टेनच्या खांद्याला गेल्या वर्षीही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळता आले नव्हते. त्याच्या खांद्याला पुन्हा दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅन करण्यात आल्यानंतर खांद्यात फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले.
स्टेनला १३ व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर दुखापत झाली. स्टेनला दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज शॉन पोलॉकचा विक्रम मोडण्यासाठी केवळ पाच बळींची गरज आहे.
स्टेनने खांद्याच्या दुखापतीतून सावरत गेल्या मार्च महिन्यात टी-२० विश्वकप स्पर्धेत पुनरागमन केले होते.