चॅम्पियन्स ट्रॉफीतून मनिष पांडे बाहेर, दिनेश कार्तिकची वर्णी

By Admin | Published: May 18, 2017 10:05 PM2017-05-18T22:05:30+5:302017-05-18T22:16:40+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीच भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडे दुखापतग्रस्त असल्याने

Out of Manish Pandey, Dinesh Karthik's out of Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफीतून मनिष पांडे बाहेर, दिनेश कार्तिकची वर्णी

चॅम्पियन्स ट्रॉफीतून मनिष पांडे बाहेर, दिनेश कार्तिकची वर्णी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीच भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडे दुखापतग्रस्त असल्याने तो चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. सराव करताना तो जखमी झाला होता.  त्याच्याजागी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये काल कोलकाता आणि बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यातही पांडे खेळू शकला नव्हता. 1 जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होत आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्स संघाकडून खेळताना दिनेश कार्तिक आपला दमदार फॉर्म दाखवून दिला होता. त्याने 14 सामन्यांमध्ये खेळताना 36.10 च्या सरासरीने 361 धावा कुटल्या. 2013 साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही कार्तिक भारतीय संघात होता. बीसीसीआयने जारी केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या राखीव खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिकचं नाव होतं.  

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबतच्या सामन्यापासून भारताच्या अभियानाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही संघ एकाच गटात असून त्यांच्यात 4 जून रोजी एजबॅस्टन येथे सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेट मालिका बंद असल्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धामध्येच हे दोन संघ आमनेसामने येतात. 
 
इंग्लंडमध्ये 1 जून ते 18 जून 2017 दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत एकूण 15 सामने होणार आहेत. त्यासाठी 2 गट पाडण्यात आले असून, प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरी गाठतील. अंतिम सामना 18 जून रोजी ओव्हल मैदानात होईल. ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड, बांगलादेश, आणि न्यूझीलंड यांचा अ गटात समावेश आहे. तर ब गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि द. आफ्रिका संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात एक जून रोजी ओव्हल येथे होणार आहे. 
 
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. सध्याची कामगिरी पाहता 2017च्या स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे क्रिकेट रसिक पाहत आहेत. सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 28 मे रोजी भारताचा पहिला सामना न्यूझीलंड बरोबर आहे तर दुसरा सामना 30 मे रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
 
असा आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ -   
विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), युवराज सिंग, केदार जाधव, हार्दीक पंडया, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि दिनेश कार्तिक. 
 
चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक
 
1 जून - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)
 
2 जून - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)
 
3 जून - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)

4 जून - भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन)
 
5 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)
 
6 जून - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ)
 
7 जून - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन)

8 जून - भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल)
 
9 जून - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ)
 
10 जून - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)

11 जून - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)
 
12 जून - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ)
 
14 जून - सेमीफायनल १ (कार्डीफ)
 
16 जून - सेमीफायनल २ (एजबॅस्टन)
 
18 जून - फायनल मॅच (ओव्हल)
                       

 

Web Title: Out of Manish Pandey, Dinesh Karthik's out of Champions Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.