पाकिस्तान विश्वचषकाबाहेर, रविवारी भारत - ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

By admin | Published: March 25, 2016 03:09 PM2016-03-25T15:09:08+5:302016-03-25T20:02:31+5:30

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला.

Out of Pakistan World Cup, Quarterfinals in India - Australia on Sunday | पाकिस्तान विश्वचषकाबाहेर, रविवारी भारत - ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

पाकिस्तान विश्वचषकाबाहेर, रविवारी भारत - ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

Next

ऑनलाइन लोकमत 

मोहाली, दि. २५ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वीस षटकात १९३ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने निर्धारीत वीस षटकात आठ बाद १७२ धावा केल्या. पाकिस्तानने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थ केली पण त्यांना यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील साखळी गटातील पुढचा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. या सामन्यातील विजयी संघ उपांत्यफेरीत तर, पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 
 
पाकिस्तानकडून खालिद लतिफने सर्वाधिक ४६ धावा केल्या. शोएब मलिकने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून रहात २० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. उमर अकमलने ३२, सलामीवीर शरजील खानने ३० धावा केल्या. यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार शाहीद आफ्रिदीने १४ धावा केल्या. त्याचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना असू शकतो. 
 
कर्णधार स्टीव्हन स्मिथची ४३ चेंडूतील ६१ धावांची तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळी आणि शेन वॉटसनने २१ चेंडूत फटकावलेल्या नाबाद ४४ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य दिले होते.
 
 
ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात चार गडी गमावून १९३ धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी दोघांनी ३८ चेंडूत नाबाद ७४ धावांची भागिदारी केली. ग्लेन मॅक्सवेलने ३० धावांची उपयुक्त खेळी केली. स्मिथ आणि मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. 
 
पाकिस्तानचा मोहम्मद सामी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात ५३ धावा दिल्या. पाकिस्तानचे बलस्थान असलेल्या गोलंदाजीवरच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खो-याने धावा वसूल केल्या.  आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप २ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
 
स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. परंतु पाक हा सामना हरल्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना साखळी सामना न राहता क्वार्टरफायनलसारखा होणार आहे. त्या सामन्यात जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाईल.

Web Title: Out of Pakistan World Cup, Quarterfinals in India - Australia on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.