मुंबईच्या मल्लांचे एकहाती वर्चस्व
By admin | Published: October 21, 2016 01:01 AM2016-10-21T01:01:10+5:302016-10-21T01:01:10+5:30
राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मुंबईच्या १९ मल्लांनी विविध गटात पदकांची लयलूट करताना वर्चस्व राखले. क्रीडा युवक संचालनालय व मुंबई उपनगर जिल्हा परिषदच्या
मुंबई : राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मुंबईच्या १९ मल्लांनी विविध गटात पदकांची लयलूट करताना वर्चस्व राखले. क्रीडा युवक संचालनालय व मुंबई उपनगर जिल्हा परिषदच्या वतीने मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाच्या यजमानपदाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजयी मल्लांचे एक महिन्याचे सराव शिबीर होणार असून त्यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होईल.
पुण्यातील इंदापुर, वालचंद्र नगर येथे झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सुरज कांबळेने सुवर्ण पटकावले. तर १९ वर्षांखालील ६० व ७४ किलो वजनी गटात अनुक्रमे गोविंदा यादव, गोकुळ यादव यांनी सुवर्ण जिंकले.
१४ वर्षांखालील एकमेव रौप्य पदक अनुज राणाने मिळवले. १७ वर्षांखालील गटात अमृता यादव, सुरज यादवने रौप्य पदक पटकावल.े तर घनकला कुंवर, पूजा मसी, साधना शेंडगे, किरण जैसवार, सुप्रिया मिश्रा, रितेश यादव, आशिष यादव, दुर्गेश यादव यांनी कांस्य जिंकले. नलीब तुंबवड, मोनाली साळुंखे यांनी रौप्य पदक मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)