सिंधू पदकाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:19 AM2024-07-26T10:19:26+5:302024-07-26T10:20:18+5:30

आठ महिने प्रकाश पादुकोण यांच्या मार्गदर्शनात सराव केल्याने तिचा आत्मविश्वास उंचावला. 

p v sindhu all set for medal hattrick | सिंधू पदकाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज

सिंधू पदकाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज

पॅरिस :पी. व्ही. सिंधू बॅडमिंटनमध्ये सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्या पद्धतीने सराव करीत आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणारी सिंधू येथे पुन्हा पोडियमपर्यंत पोहोचल्यास पदकाची हॅट्ट्रिक साधणारी पहिली भारतीय खेळाडू ठरेल. सिंधू काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये नाही. या पार्श्वभूमीवर आठ महिने प्रकाश पादुकोण यांच्या मार्गदर्शनात सराव केल्याने तिचा आत्मविश्वास उंचावला. 

सरावानंतर सिंधू म्हणाली, ‘पदक जिंकणे हेच लक्ष्य असेल. मग ते सुवर्ण असो वा कांस्य, कुठलेही असो. तिसरे पदक जिंकण्यासाठी स्वत:वर दडपण घेत नाही. प्रत्येक वेळी सहभागी होताना माझे नवे ऑलिम्पिक असते. पदकाची हॅट्ट्रिक पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.’

पॅरिसमध्ये दाखल होण्याआधी सिंधूने जर्मनीतील सारब्रुकेनमध्ये सराव केला. त्या ठिकाणी  समुद्रसपाटीपासून उंचीवर फ्रान्ससारखे वातावरण होते. परिस्थितीशी एकरूप होण्यासाठी तिने कमी ऑक्सिजन असलेल्या खोलीत वास्तव्य केले. स्वत:च्या स्ट्रोक्समध्ये सुधारणा केली. 

पादुकोण यांच्या मार्गदर्शनात सराव केल्यामुळे काय फरक जाणवतोय, असे विचारताच सिंधू म्हणाली, ‘स्ट्रोकमध्ये चांगला आत्मविश्वास मिळाला आहे. लांबलचक रॅलीजमध्ये चांगली कामगिरी केली. महिला एकेरीत लांबलचक रॅलीज चालतात, त्यादृष्टीने स्वत:ला सज्ज केले आहे. प्रकाश सरांनी माझ्या खेळाची शैली सुधारली. माझा वेगळा खेळ तुम्हाला कोर्टवर पहायला मिळेल.’
 

Web Title: p v sindhu all set for medal hattrick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.