पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
By admin | Published: August 16, 2016 03:53 AM2016-08-16T03:53:33+5:302016-08-16T05:35:18+5:30
बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेतच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या ताई जू यिंगवर २१-१३, २१-१५ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १६ - बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेतच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या ताई जू यिंगवर २१-१३, २१-१५ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
रिओ ऑलिम्पिक सामन्यात भारताची फुलराणी सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत भारतीयांना काही अंशी दिलासा दिला. उपउपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूने चीनच्या ताई जू यिंगवर २१-१३, २१-१५ अशी मात केली.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी सायना नेहवाल रविवारी युक्रेनची खेळाडू मारिया युलिटिनाकडून १८-२१, १९-२१ने पराभूत झाली. बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या या लढतीतील पराभवासह सायनाचे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे आता भारतातर्फे महिला एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीमध्ये श्रीकांत यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.