पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत
By Admin | Published: October 18, 2015 03:06 AM2015-10-18T03:06:29+5:302015-10-18T03:06:29+5:30
भारतीय आव्हानाचे प्रतिनिधित्व करणारी १३ वी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली स्पेनची कॅरोलिना मारिन हिचा शनिवारी रोमहर्षक
ओडेंसे : भारतीय आव्हानाचे प्रतिनिधित्व करणारी १३ वी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली स्पेनची कॅरोलिना मारिन हिचा शनिवारी रोमहर्षक सामन्यात २१-१५, १८-२१, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली.
या स्पर्धेत बिगरमानांकित असलेल्या सिंधूने उपांत्यपूर्व आणि उपांत्य लढतीतही आपल्यापेक्षा सरस खेळाडूंना नमविले होते. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कास्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला अजिंक्यपदाच्या लढतीत चीनची चौथी मानांकित ली जुईरुई हिच्याविरुद्ध दोन हात करावे लागतील. जुईरुईने दुसऱ्या उपांत्यफेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनला २१-८, २०-२२, २१-१० असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
सुपर सिरीज फायनलमध्ये प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत ४५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २०११च्या वर्ल्ड चॅम्पियन आणि २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या सहाव्या मानांकित यिहान हिचे आव्हान २१-१८, २१-१९ असे मोडीत काढले. (वृत्तसंस्था)