P. V. Sindhu : सिंधू कशी झाली 'सिल्व्हर'कन्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:47 AM2021-08-15T05:47:20+5:302021-08-15T05:47:54+5:30
P. V. Sindhu : जगातील आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये आज भारतीयांनी स्थान मिळवले आहे. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर बरीच वर्षे बॅडमिंटनमध्ये माघारलेल्या भारताला चैतन्य मिळवून दिले ते सायना आणि सिंधूने.
सायनाने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारताच्या ताकदीची झलक दाखवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडू
जिंकू शकतात, हा विश्वास तिने मिळवून दिला. मात्र, पी. व्ही. सिंधूने सायनाच्या कामगिरीने प्रेरणा घेऊन त्याही पुढे पाऊल टाकत चीन, मलेशिया, कोरिया आणि जपान या बॅडमिंटनमधील महाशक्तीपुढे आव्हान निर्माण केले.
सिंधू पर्व कसे सुरू झाले?
१३व्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा गाजवल्यानंतर सिंधूने वयाच्या १४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सुरु झाले ते सिंधू पर्व...
सिंधूला हे सारे का जमते?
‘सिंधूचा खेळाच्या बाबतीत असलेला दृष्टिकोन जबरदस्त असून ती कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही,’ गुरु गोपीचंद यांच्या या वाक्यातून सिंधूने घेतलेली मेहनत कळून येते.
महाशक्तीला आव्हान देत उभं केलं साम्राज्य
जगातील आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये आज भारतीयांनी स्थान मिळवले आहे. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर बरीच वर्षे बॅडमिंटनमध्ये माघारलेल्या भारताला चैतन्य मिळवून दिले ते सायना आणि सिंधूने.
सायना ॲालिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय शटलर ठरली, तर सिंधू ॲालिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि सलग दोन ॲालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली शटलर ठरली. सलग दोन ॲालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती केवळ दुसरी भारतीय आहे हे विशेष.
अनेक अडथळ्यांचा सामना
वयाच्या ८व्या वर्षापासून रॅकेट हाती घेतल्यानंतर मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूला बॅडमिंटनचे धडे मिळाले. यासाठी तिला दररोज घरापासून ५६ किमी प्रवास करावा लागायचा.
हार मानेल ती सिंधू कसली. तिने कधीही सरावाचा दिवस चुकवला नाही. येथूनच कधीही हार न मानण्याची वृत्ती तिच्या अंगात आली.
गोपीचंद यांच्या अकादमीत प्रवेश घेतल्यानंतर चिमुकली सिंधू, चॅम्पियन सिंधू म्हणून सर्वांसमोर आली.
सिंधूने जिंकलेले महत्त्वाची पदके
कांस्य- ८
रौप्य- ५
सुवर्ण- ३
आशियाई ज्यूनिअर अजिंक्यपद :
कांस्य (एकेरी व मिश्र २०११), सुवर्ण (२०१२)
राष्ट्रकुल युवा स्पर्धा : सुवर्ण, २०११.
दक्षिण आशियाई स्पर्धा :
सुवर्ण (महिला सांघिक), रौप्य - एकेरी (२०११)
आशियाई अजिंक्यपद : कांस्य (२०१४)
राष्ट्रकुल स्पर्धा :
कांस्य (२०१४), रौप्य (२०१८), सुवर्ण (२०१८, मिश्र गट)
आशियाई क्रीडा :
रौप्य (२०१८), कांस्य (२०१४ महिला सांघिक).
जागतिक अजिंक्यपद :
कांस्य (२०१३ आणि २०१४), रौप्य (२०१७ आणि २०१८), सुवर्ण (२०१९).
ऑलिम्पिक : रौप्य (२०१६), कांस्य (२०२१)