पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: April 28, 2017 02:17 AM2017-04-28T02:17:39+5:302017-04-28T02:17:39+5:30
आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त पी.व्ही. सिंधूने आज येथे शानदार कामगिरी करताना बॅडमिंडन आशिया चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
वुहान : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त पी.व्ही. सिंधूने आज येथे शानदार कामगिरी करताना बॅडमिंडन आशिया चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
रिओत रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने अमानांकित जपानची खेळाडू अया ओहोरी हिला दुसऱ्या फेरीत ४0 मिनिटांत २१-१४, २१-१५ असे सहज नमवले.
तथापि, पुरुष गटात अजय जयराम याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला चीन तैपईच्या सु जेन हाओ याच्याकडून १९-२१, १0-२१ असा पराभव पत्करावा लागला.
जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित सिंधूने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार दया अयुस्टिन हिचा एकतर्फी लढतीत २१-८, २१-१८ असा पराभव करीत आपल्या अभियानास सुरुवात केली. लंडन आॅलिम्पिकमधील कास्यपदक प्राप्त सायना नेहवाल, एच.एस. प्रणव आणि दुहेरीतील जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष गटात जयरामने पहिल्या फेरीत चीनच्या पाचव्या मानांकित टियान होऊवेई याचा सरळ सेटस्मध्ये पराभव केला होता. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी यांना ५0 मिनिटे रंगलेल्या लढतीत झेंग सिवेई आणि चेन किंगचेन यांच्याकडून १५-२१, २१-१४, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.
सिक्की आणि अश्विनी पोनप्पा यांनादेखील दुहेरीत दक्षिण कोरियाच्या चाए यू जुंग आणि किम सो यियोंग या जोडीकडून ३७ मिनिटांत २0-२२, १६- असा पराभवाचा सामना करावा लागला.