पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत
By admin | Published: November 29, 2014 01:06 AM2014-11-29T01:06:53+5:302014-11-29T01:06:53+5:30
गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून चीनच्या हॅन लीचा 3 गेममध्ये पराभव करून मकाऊ ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या एकेरीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
Next
मकाऊ : गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून चीनच्या हॅन लीचा 3 गेममध्ये पराभव करून मकाऊ ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या एकेरीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने चीनची पाचवी मानांकित हॅन ली हिचा एका तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या लढतीत 21-17, 19-21, 21-16 असा पराभव करून अंतिम चारमध्ये आपली जागा निश्चित केली. या स्पर्धेत द्वितीय मानांकन असलेल्या सिंधूची उपांत्यफेरीत सामना कॅनडाच्या मिशेल ली आणि थायलंडच्या बुसानन ओंगबुमरुंगपान यांच्यातील विजेत्याविरुद्ध होईल.
उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूने सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करीत 5-क् अशी गुणस्थिती केली; परंतु चीनच्या हानने उत्कृष्ट खेळ करीत 6-5 अशी एका गुणाची आघाडी घेतली; पण हॅन ही आघाडी जास्त वेळ टिकवू शकली नाही. सिंधूने सलग गुण मिळवून पहिली गेम 21-17 अशी जिंकली. दुस:या गेममध्ये सिंधूने पुन्हा 11-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर हॅनने जिगरबाज खेळ करून सलग 5 गुण मिळवून बरोबरी साधली. सूर गवसलेल्या हॅनने शेवटी ही गेम 21-19 अशी जिंकली.
तिस:या आणि निर्णायक गेममध्ये सुरुवातीला हॅन 6-3 गुणांनी पुढे होती. मात्र, सिंधूने नेटजवळ प्लेसिंग आणि काही जोरदार स्मॅश मारून हॅनची आघाडी मोडीत काढून 14-8 गुणांची आघाडी आपल्याकडे घेतली. नंतर मात्र सूर गवसलेल्या सिंधूने
सलग 4 गुण घेत हॅनला कोणतीही संधी न देता गेम 21-16 अशी
जिंकली. (वृत्तसंस्था)