विश्व बँडमिंटन मानांकनात पी. व्ही. सिंधू पाचव्या स्थानी
By admin | Published: February 18, 2017 01:05 AM2017-02-18T01:05:47+5:302017-02-18T01:05:47+5:30
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेता पी. व्ही. सिंधू बीडब्ल्यूएफ विश्व मानांकनामध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला
नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेता पी. व्ही. सिंधू बीडब्ल्यूएफ विश्व मानांकनामध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.
गेल्या महिन्यात सैयद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकाविणाऱ्या सिंधूने कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे मानांकन पटकाविले आहे. क्रमवारीत सर्वोत्तम मानांकन असलेली ती भारतीय खेळाडू आहे. हैदराबादच्या या २१ वर्षीय खेळाडूच्या नावावर ६९३९९ मानांकन गुणांची नोंद आहे. या व्यतिरिक्त सायना नेहवाल अव्वल दहामध्ये समावेश असलेली दुसरी भारतीय खेळाडू आहे. ती नवव्या स्थानी आहे. पुरुष एकेरीमध्ये अजय जयराम १८ व्या, के. श्रीकांत २१व्या आणि एस. एस. प्रणय २३ व्या स्थानी आहेत. (वृत्तसंस्था)