वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानावर झेप
By admin | Published: April 6, 2017 05:29 PM2017-04-06T17:29:44+5:302017-04-06T17:49:09+5:30
ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटाकावणा-या भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन असोशिएशनच्या रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 06 - ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटाकावणा-या भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन असोशिएशनच्या रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया ओपन चॅम्पियन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने स्पेनच्या कॅरोलिया मारिन हिचा 21-19, 21-16 अशा दोन सेटमध्ये पराभव करत जेतेपद मिळवले होते. या यशस्वी कामगिरीमुळे ती जागतिक रॅकिंगच्या दुस-या स्थानकावर पोहचली आहे.
पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्याची माहिती भारतीय बॅडमिंटन संघटनेने ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान, या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सुद्धा पी.व्ही. सिंधूनचे ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, खेळांसाठी आज मोठा दिवस आहे. पी. व्ही. सिंधू आपल्या करियरच्या सर्वश्रेष्ठ जागतिक रॅंकिंगच्या दुस-या स्थानकावर पोहचली आहे.
दरम्यान, काल झालेल्या मलेशिया ओपनमध्ये पी. व्ही. सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा पत्करावा लागला होता. मात्र, आज जागतिक बॅडमिंटन रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्यामुळे तिच्यासाठी आणि भारतीय बॅडमिंटनसाठी ही खुशखबर आहे.
P V Sindhu is breaking her own records and raising the benchmark with her accomplishments! World No.✌️ pic.twitter.com/E95gsY5xLT
— BAI Media (@BAI_Media) April 6, 2017