पेसच्या ७व्या सहभागात अडथळा

By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस विश्वविक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिक स्पर्धा खेळण्यास सज्ज आहे.

Pace halted with 7th round | पेसच्या ७व्या सहभागात अडथळा

पेसच्या ७व्या सहभागात अडथळा

Next


नवी दिल्ली : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस विश्वविक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिक स्पर्धा खेळण्यास सज्ज आहे. परंतु, या वेळी त्याच्यासमोर वेगळीच अडचण उभी राहिली आहे. या वेळी रिओ आॅलिम्पिकसाठी स्टार खेळाडू रोहन बोपण्णाला पेससह दुहेरीमध्ये सहभागी होण्यास सांगितले जात आहे. एटीपी क्रमवारीत अव्वल दहामध्ये असलेल्या बोपण्णाला पुरुष दुहेरीसाठी थेट प्रवेश मिळाला असून त्याला आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळाली आहे. जर त्याने पेसहून (एटीपी ४६) कमी रँकिंगच्या खेळाडूची जोडीदार म्हणून निवड केली तर पेसचे विक्रमी सातवे आॅलिम्पिक खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते.
विशेष म्हणजे नुकताच मार्टिना हिंगीससह विक्रमी १८वे ग्रँडस्लॅम पटकावलेल्या पेसला मिश्र दुहेरीत सानिया मिर्झासह खेळण्याचा आग्रह सोडावा लागेल. त्यामुळेच एआयटीए आॅलिम्पिक स्पर्धेपूर्वी कोणताही वाद न उद्भवण्यासाठी व सर्वांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर सध्या बोपण्णाने आपला निर्णय कळवला नसला तरी मिळालेल्या माहितीनुसार पुरुष दुहेरीसाठी त्याला पेससह खेळण्याबाबत सांगितले जाऊ शकते. दखल घेण्याची बाब म्हणजे अव्वल मानांकन असलेले खेळाडू नसल्याने भारताला आॅलिम्पिकमध्ये केवळ एकच दुहेरी टीम खेळविता येणार आहे.
अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (एआयटीए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘या महत्त्वाच्या स्पर्धेत देशाचा क्रमांक एक व दोनचा खेळाडू एक संघ म्हणून खेळवण्यातच समझदारी आहे. कोणीही असाच विचार करेल. बोपण्णाकडे पर्याय आहे, परंतु आता कोणा एका व्यक्तीचा प्रश्न नसून संपूर्ण देशाचा आहे. त्यामुळेच बोपण्णा समजूतदारीने निर्णय घेईल अशी आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)
मिश्र दुहेरी
सोडावे लागणार
आयटीएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या खेळाडूला आॅलिम्पिकमध्ये सहभागी करून घेण्याबाबत राष्ट्रीय संघ अपील करू शकतो. जरी तो खेळाडू डेव्हीस कपच्या नियमामध्ये बसत नसला तरीही राष्ट्रीय संघ अशी भूमिका घेऊ शकतो. त्याच वेळी जर पेसला रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळायचे असेल तर त्याला केवल पुरुष दुहेरीमध्येच खेळावे लागेल. कारण सानिया मिर्झाकडे या वेळी आपला जोडीदार स्वत: निवडण्याचा अधिकार असून ती पेसच्या तुलनेत बोपण्णाला पसंती देणार हे जवळपास निश्चित आहे. २०१२ सालच्या आॅलिम्पिकमध्ये सानियाला महेश भूपतीसह खेळायचे होते; मात्र त्या वेळी तिला पेससह खेळावे लागले होते.

Web Title: Pace halted with 7th round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.