न्यूझीलंडकडून पाकला व्हाइटवॉश

By Admin | Published: February 4, 2015 01:53 AM2015-02-04T01:53:03+5:302015-02-04T01:53:03+5:30

न्यूझीलंड संघाने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव करून विजय नोंदवीत २-०ने मालिका जिंकली.

Pacha Whitewash from New Zealand | न्यूझीलंडकडून पाकला व्हाइटवॉश

न्यूझीलंडकडून पाकला व्हाइटवॉश

googlenewsNext

नेपियर : केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांची आक्रमक शतकी खेळी आणि नंतर टीम साउदी, एडम मिल्ने, नॅथन मॅक्युलम, ग्रॅन्ट एलियोट यांनी घेतलेल्या प्रत्येकी दोन विकेटच्या जोरावर न्यूझीलंड संघाने दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव करून विजय नोंदवीत २-०ने मालिका जिंकली.
मॅकलिन पार्कच्या मैदानावर नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार मॅक्युलमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मार्टिन गुप्तील (७६), विलियम्सन (८८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ११२) आणि रॉस टेलर (७० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२) यांनी सार्थक ठरविला. या तिघांच्या धुवाधार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ५ बाद ३६९ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या ग्रॅन्ट एलिओटने २८ धावा केल्या. त्याने २१ चेंडूंत दोन षटकार ठोकले. रॉन्ची शून्यावर बाद झाला, तर एनएल मॅक्युलम ९ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफानने ५२ धावांत २ गडी बाद केले. त्यांच्या शाहिद आफ्रिदीने, एसान अदिल, अहमद शेहजादने प्रत्येकी एक बळी घेतला.
३७० धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस मैदानावर उतरलेल्या पाक संघाचा डाव ४३.१ षटकांत सर्वबाद २५० धावांत संपुष्टात आला. पाककडून मोहम्मद हाफिज व अहमद शेहजादने आघाडीला फलंदाजीस येऊन अनुक्रमे ८६ व ५५ धावांची खेळी करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. हाफिजने ८९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार मारले. त्यानंतर फक्त कर्णधार मिसबाह उल हकहाच ४५ धावा करू शकला. (वृत्तसंस्था)

न्यूझीलंड : ५० षटकांत ५ बाद ३६९़ (मार्टिन गुप्तील ७६, केन विलियम्सन ११२, रॉस टेलर नाबाद १०२, ब्रॅन्डेन मॅक्युलम ३१़ मोहंमद इरफान २/५२, अहमद शहजाद १/२९)़

पाकिस्तान : ४३़१ षटकांत सर्वबाद २५०़ (मोहंमद हाफिज ८६, अहमद शहजाद ५५, मिस्बाह उल हक ४५़ टीम साउथी २/५२, अ‍ॅडम मिल्ने २/५२, नॅथन मॅक्युलम २/३३)़

Web Title: Pacha Whitewash from New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.