मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पेस-बोपण्णा समोरासमोर

By admin | Published: September 9, 2015 02:36 AM2015-09-09T02:36:02+5:302015-09-09T02:36:02+5:30

रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस आपापल्या सहकाऱ्यांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध झुंजणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय

Paes-Bopanna face mixed doubles semifinal | मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पेस-बोपण्णा समोरासमोर

मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पेस-बोपण्णा समोरासमोर

Next

न्यूयॉर्क : रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस आपापल्या सहकाऱ्यांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध झुंजणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय टेनिस चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
चौथे मानांकन प्राप्त पेस व मार्टिना हिंगीस यांनी अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. त्यांना रोमानियाच्या सिमोना हालेप व होरिया तेकाऊ या जोडीविरुद्ध पुढे चाल मिळाली. बोपण्णा व चिनी ताइपेची त्याची सहकारी युंग जान चान या दुसरे मानांकन प्राप्त जोडीने संघर्षपूर्ण लढतीत चिनी ताइपेच्या सू वेई सियेह व फिनलँडच्या हेन्री कोंटिनेन यांचा ७-६, ५-७, १३-११ ने पराभव केला.
सहावे मानांकन प्राप्त जोडीने सहा एस लगावले, तर प्रतिस्पर्धी जोडीला केवळ तीन एस लगावता आले. बोपण्णा-मर्जिया जोडीला यानंतर डोमिनिक इंग्लोट-रॉबर्ट लिंडस्टेट या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. ज्युनिअर मुलींच्या विभागात भारताच्या क रमन कौर थांडीने जर्मनीच्या कॅथरिना होबगार्स्कीचा ६-३, ७-६ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत करमनला रशियाच्या एवजिनिया लेवाशोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. १५ वे मानांकन प्राप्त प्रांजला यादलापल्लीला पहिल्या फेरीत यूनानच्या वालेंटिनीने ७-६, ६-३ ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)

बोपण्णा व फ्लोरिन मर्जिया या जोडीने पुरुष दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी कॅ नडाच्या डेनियल नेस्टर व फ्रान्सच्या एडुअर्ड रोजर व्हेसलिन या जोडीचा ६-७, ६-४, ६-३ ने पराभव करीत अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले.

Web Title: Paes-Bopanna face mixed doubles semifinal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.