पेस-हिंगीस अंतिम फेरीत

By Admin | Published: January 31, 2015 03:36 AM2015-01-31T03:36:20+5:302015-01-31T03:36:20+5:30

भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपली विजयी घोडदौड कायम

Paes-Hingis in the final round | पेस-हिंगीस अंतिम फेरीत

पेस-हिंगीस अंतिम फेरीत

googlenewsNext

मेलबोर्न : भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखताना मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये मजल मारली;मात्र भारताची स्टार महिला खेळाडू सानिया मिर्झा हिला ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससह पराभवाचे तोंड पाहावे लागले़
सातवे मानांकन प्राप्त पेस आणि हिंगीस या जोडीने जबरदस्त खेळ करताना बेस लाईन आणि नेटवर अप्रतिम फटके लगावून उपांत्य फेरीच्या लढतीत उरुग्वेचा पाब्लो कुएवास आणि चिनी तैपेईचा
सु वेई सीह जोडीवर सरळ सेटमध्ये
७-५, ६-४ अशा फरकाने मात
करीत थाटात फायनलमध्ये प्रवेश केला़
पेस आणि हिंगीस या जोडीने आपला मुकाबला १ तास १४ मिनिटांत आपल्या नावे केला़ विजयी जोडीने ३३ विनर्स आणि ८ पैकी तीन ब्रेक गुणांची कमाई केली़ पेसने २००३ आणि २०१० मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचा मिश्र दुहेरीचा किताब पटकावला होता़ आता तो आपल्या तिसऱ्या किताबापासून एक पाऊल दूर आहे़
दुसऱ्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सानिया आणि सोरेस या तृतीय मानांकन प्राप्त जोडीला फ्रान्सची क्रिस्टिना म्लादेनोविच आणि कॅनडाचा डॅनियल नेस्टर यांच्याकडून अटीतटीच्या लढतीत ३-६, ६-२, १०-८ अशा फरकाने मात खावी लागली़
सानिया आणि सोरेस यांनी पहिला सेट ६-३ ने सहज आपल्या नावे केला; मात्र पुढचा सेट त्यांना २-६ ने गमवावा लागला़ सुपर टायब्रेकरमध्ये दोन्ही जोड्यांमध्ये चांगलीच टक्कर झाली; मात्र अखेर म्लादेनोविच आणि नेस्टर यांनी हा १०-८ ने जिंकत अंतिम फेरीत जागा मिळविली़
२००९ मध्ये या स्पर्धेच्या फायनलमध्ये सानियाला रोमानियाच्या होरिया टेकाऊसह पराभवाचा सामना करावा लागला होता;मात्र या वेळी उपांत्य फेरीत सानियाला गाशा गुंडाळावा लागला़ सानिया आणि सोरेस यांनी गतवर्षी मात्र अमेरिकन ओपनचा किताब आपल्या नावे केला होता़ (वृत्तसंस्था)

Web Title: Paes-Hingis in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.