ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पेस - हिंगिसला विजेतेपद
By Admin | Published: February 1, 2015 12:33 PM2015-02-01T12:33:55+5:302015-02-01T12:34:10+5:30
भारताचा टेनिसपटूने लिएंडर पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १ - भारताचा टेनिसपटूने लिएंडर पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पेस -हिंगिस जोडीने डेनिएल नेस्टर आणि क्रिस्टिना म्लादेनोविक यांचा ६-४ आणि ६-३ असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या ट्रॉफीवर नाव कोरले. लिएंडर पेसचे हे कारकिर्दीतील १५ वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत लिएंडर पेस - मार्टिना हिंगिस (स्वित्झर्लंड) विरुद्ध नेस्टर ( कॅनडा) - म्लादेनोविक (फ्रान्स) यांच्यात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ४१ वर्षीय पेसने हिंगिससह खेळताना तिस-या सीडेड नेस्टर - म्लादेनोविक या जोडीचा पराभव केला.