पेस- हिंगीसचे आव्हान संपुष्टात

By admin | Published: July 8, 2016 12:54 AM2016-07-08T00:54:13+5:302016-07-08T00:54:13+5:30

विम्बल्डन मिश्र दुहेरीचे गतविजेते भारताचा लिएंडर पेस आणि स्वित्झरलॅण्डची मार्टिना हिंगीस यांचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले आहे. कोन्टिनन आणि वॅटसन यांनी दीड

Paes-Hingis's challenge ends | पेस- हिंगीसचे आव्हान संपुष्टात

पेस- हिंगीसचे आव्हान संपुष्टात

Next

लंडन : विम्बल्डन मिश्र दुहेरीचे गतविजेते भारताचा लिएंडर पेस आणि स्वित्झरलॅण्डची मार्टिना हिंगीस यांचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले आहे. कोन्टिनन आणि वॅटसन यांनी दीड तास चाललेल्या या लढतीत पेस-हिंगीसचा ३ -६, ६-३, ६- २ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
गुरूवारी रात्री झालेल्या या सामन्यात फिनलॅण्डच्या हेन्री कोन्टिनन आणि ब्रिटनच्या फिदर वॅटसन या युवा खेळाडूंच्या जोडीने अनुभवी आणि गतविजेते पेस - हिंगीस यांचा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये पेस- हिंगीसने आपला अनुभव पणाला लावत विजय मिळवला. मात्र दुसरा आणि तिसरा सेट कोन्टिनन आणि वॅटसन या जोडीने सहज जिंकत सामना खिशात घातला. पेस हिंगीसने ५ पैकी २ ब्रेक पॉईंटचा फायदा घेतला. तर कोन्टिनन- वॅटसनने ६ पैकी ४ ब्रेक पॉईंट घेतले. विजयी जोडीचा पुढचा सामना उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेचा स्कॉट लिप्स्की आणि रशियाची अ‍ॅला कुद्रेयेत्सोवा यांच्याशी होणार आहे.

Web Title: Paes-Hingis's challenge ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.