पेस - आदिल जोडी उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: June 22, 2017 01:03 AM2017-06-22T01:03:27+5:302017-06-22T01:03:27+5:30

लिएंडर पेस - आदिल शमसदीन या अव्वल मानांकित जोडीने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना एगॉन चॅलेंजर एटीपी टेनिस स्पर्धेच्या

Paes - In the quarter-finals of Adil Jodi | पेस - आदिल जोडी उपांत्यपूर्व फेरीत

पेस - आदिल जोडी उपांत्यपूर्व फेरीत

Next

इलक्ले (ग्रेट ब्रिटन) : लिएंडर पेस - आदिल शमसदीन या अव्वल मानांकित जोडीने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना एगॉन चॅलेंजर एटीपी टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच, पूरव राजा - दिविज शरण या भारतीय जोडीनेही सहज बाजी मारताना उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित केली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या सर्व भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
पेस - आदिल यांनी अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मॅट रीड - जॉन पॅट्रिक स्मिथ यांच्याविरुद्ध ४-६, ६-३, १२-१० असा विजय मिळवला. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर पेस - आदिल यांनी मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना शानदार पुनरागमन करून बाजी मारली. दुसरीकडे, पूरव - दिविज या जोडीने आक्रमक खेळाच्या जोरावर व्हिक्टर एस्टे्रला बुर्गोस - दारिया किंग या द्वितीय मानांकित जोडीचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवत धक्कादायक निकाल नोंदवला.
भारताचा अन्य स्टार खेळाडू रोहन बोपन्ना याने इवान डोडिगसह स्पर्धेत विजयी कूच करताना कायल एडमंड - थनासी कोकिनाकिस यांना ६-३, ६-७, १०-७ असे नमवले. (वृत्तसंस्था)

Web Title: Paes - In the quarter-finals of Adil Jodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.