खेळात सुधारणा होत असल्याचे समाधान : पेस
By admin | Published: January 13, 2015 02:36 AM2015-01-13T02:36:06+5:302015-01-13T02:36:06+5:30
चेन्नई ओपनमध्ये दुहेरीचे अजिंक्यपद मिळविता आले नाही, याची खंत आहे; मात्र दिवसेंदिवस खेळात सुधारणा होत असल्याचे समाधान आहे,
चेन्नई : चेन्नई ओपनमध्ये दुहेरीचे अजिंक्यपद मिळविता आले नाही, याची खंत आहे; मात्र दिवसेंदिवस खेळात सुधारणा होत असल्याचे समाधान आहे, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्त केले आहे़
चेन्नई ओपनच्या दुहेरीच्या फायनलमध्ये पेसला दक्षिण आफ्रिकेचा जोडीदार रावेन क्लासेनसह पराभवाचा सामना करावा लागला़ त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर सामधान मानावे लागले़ पेस पुढे म्हणाला, की अंतिम सामन्यात आम्ही सर्वोत्कृष्ट खेळ केला होता़ प्रतिस्पर्धी जोडी आणि आमच्यामध्ये केवळ एका गुणाचे अंतर होते़ जर, सुपर टायब्रेकर नसता, तर आम्ही सामन्यात वर्चस्व राखले असते; मात्र तसे झाले नाही, याची खंत आहे़ आता आगामी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे़ (वृत्तसंस्था)