भारताच्या तुलनेत पाक खेळाडूंचे मानधन तुटपुंजे

By admin | Published: July 13, 2017 12:48 PM2017-07-13T12:48:49+5:302017-07-13T12:48:49+5:30

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2017-18 साठी आपल्या 35 खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंचा विचार करता पाकिस्तानच्या खेळाडूंना अल्प मानधन देण्यात आल्याचे चित्र दिसतेय

Pak players' honor to India compared to India | भारताच्या तुलनेत पाक खेळाडूंचे मानधन तुटपुंजे

भारताच्या तुलनेत पाक खेळाडूंचे मानधन तुटपुंजे

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2017-18 साठी आपल्या 35 खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंचा विचार करता पाकिस्तानच्या खेळाडूंना अल्प मानधन देण्यात आल्याचे चित्र दिसतेय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहिर केलेल्या करारातून मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमलला वगळण्यात आले आहे. पाकिस्ताननं भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
वर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयकडून अ, ब आणि क गटातील खेळाडूंचे मानधन दुप्पट केले होते. अ गटातील खेळाडूंना 2 कोटी, ब गटातील खेळाडूंना 1 कोटी, तर क गटातील खेळाडूंना 50 लाख रुपये मानधन देण्याचे बीसीसीआयने जाहीर केले होते. तसेच बीसीसीआय प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख , एकदिवसीयसाठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख इतके मानधन देण्याचेही जाहीर केले होते. हा झाला भारतीय खेळाडूंना मिळणारा वार्षिक पगार पण तुम्हाला आता चॅम्पियन झालेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंचा वार्षिक पगार माहित आहे का? पाकच्या खेळाडूंचा पगार वाचून बीसीसीआचा तुम्हाला आभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. 

भरतनाट्यम डान्सर बनण्याचं होतं मितालीचं स्वप्न
धावांच्या एव्हरेस्टवर मिताली ‘राज’!
   
मिताली राजला शुभेच्छा देताना विराट कोहलीची झाली "गोची"
पीसीबीच्या सध्याच्या करारपद्धतीनुसार "अ" श्रेणीतील खेळाडूंना साडेसहा लाख रुपये पगार आहे. पाक चलनानुसार त्यांचे वार्षिक मानधन 78 लाख रुपये आहे. तेच मानधन भारतीय चलनानुसार 48 लाख रुपये होतं. अ श्रेणीतील भारतीय खेळाडूंचे वार्षिक मानधन 2 कोटी रुपये आहे. भारत आणि पाक खेळाडूंच्या अ श्रेणीतील मानधनात चारपट फरक दिसून येतो. ब वर्गासाठी पाकिस्तानी खेळाडूंना वर्षाला 54 लाख (पाक चलनानुसार) रुपये दिले जाते. भारतीय चलनानुसार याची किंमत 33 लाख रुपये होतीय. भारतातील ब श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जाते. म्हणजे ब गटातील भारतीय खेळाडूंचे मानधन पाक खेळाडूंपेक्षा तीनपट आहे.
क वर्गासाठी पाकिस्तान आपल्या खेळाडूंना वर्षाला 31 लाख रुपये मानधन देते. भारतीय चलनानुसार 19 लाख रुपये. बीसीसीआय भारतातील क श्रेणीतील खेळाडूंना 50 लाख रुपये मानधन देते. इथेही भारतीय खेळाडूंना पाक खेळाडूंच्या तीनपट अधिक मानधन मिळतेय.

 

Web Title: Pak players' honor to India compared to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.