पाक-विंडीजला विजयाची प्रतीक्षा

By admin | Published: February 21, 2015 02:27 AM2015-02-21T02:27:55+5:302015-02-21T02:27:55+5:30

विश्वचषकाच्या सुरुवातीलाच पराभवाचे तोंड पाहणाऱ्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाला विजयाची प्रतीक्षा आहे.

Pak-West Indies wait for victory | पाक-विंडीजला विजयाची प्रतीक्षा

पाक-विंडीजला विजयाची प्रतीक्षा

Next

ख्राईस्टचर्च : विश्वचषकाच्या सुरुवातीलाच पराभवाचे तोंड पाहणाऱ्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाला विजयाची प्रतीक्षा आहे. उद्या शनिवारी ब गटात उभय संघ कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
पाकला भारताकडून ७६ धावांनी पराभवाचा धक्का बसला, तर विंडीजला आयर्लंडने ३०० वर धावांचे लक्ष्य गाठून धूळ चारली होती. पहिल्या पराभवानंतर पाक संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर तसेच विंडीज खालून दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी उद्याची लढत निर्णायक असेल. पाक संघात सईद अजमल राहणार नसून, अव्वल फिरकी गोलंदाज सुनील नरेन याची विंडीजला उणीव जाणवणार आहे. या दोन्ही गोलंदाजांची शैली सदोष असल्याने आयसीसीने त्यांना निलंबित केले आहे.
सिनियर खेळाडूंचा भरणा असलेल्या विंडीजचे नेतृत्व युवा जेसन होल्डरकडे आहे. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, लेंडल सिमन्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मर्लेन सॅम्युअल्स, डेरेन सॅमी या खेळाडूंच्या उपस्थितीत विंडीजचा फलंदाजी क्रम भक्कम वाटतो. गोलंदाजीची भिस्त पहिल्या सामन्यात बाहेर बसलेला सुलेमान बेन आणि केमर रोच यांच्याकडे असेल.
उद्याच्या लढतीबद्दल जेसन म्हणाला, ‘आर्यलंडविरुद्धचा पराभव डोक्यात न ठेवता पाकवर विजय मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा प्रयत्न असेल.’ दुसरीकडे पाकच्या फलंदाजीची भिस्त अनुभवी युनूस खान, कर्णधार मिस्बाह उल हक आणि वन डेत आठ हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ असलेल्या शाहीद आफ्रिदीवर असेल. कर्णधार मिस्बाह म्हणाला, ‘विश्वचषकात पुढचा पल्ला गाठायचा झाल्यास उद्या विजय आवश्यक राहील. एकंदरीत उभय संघांसाठी‘ करो या मरो’ अशीच ही लढत ठरणार आहे. (वृत्तसंस्था)

४पाकिस्तान व वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत १२६ एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानने ५५ सामने जिंकले असून ६८ सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. तीन लढती टाय झाल्या आहेत.
४विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ ९ वेळा एकमेकांसमोर ठाकले आहेत. यामध्ये पाकिस्तानने ३ वेळा तर वेस्टइंडिजने ६ वेळा विजय नोंदविला आहे.

४ पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहजाद, एहसान अदील, हॅरिस सोहेल, मोहम्मद हाफिज, मोहम्मद इरफान, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहिद आफ्रिदी, शोएब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल (यष्टीरक्षक), बाहब रिआज, यासीर शाह, युनिस खान
४ वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), मार्लोल सॅम्युअल्स (उपकर्णधार), सुलेमान बेन, डॅरेन ब्रावो, जॉनथन कार्टर, शेल्डन कोट्रेल, क्रिस गेल, निकिता मिलर, दीनेश रामदीन (यष्टीरक्षक), केमार रोच, अँड्रे रसल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्ॅवन स्मिथ, जेरॉम टेलर

Web Title: Pak-West Indies wait for victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.