पाकने सपशेल नांगी टाकली

By admin | Published: June 6, 2017 05:07 AM2017-06-06T05:07:22+5:302017-06-06T05:07:22+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने एकतर्फी विजय मिळविला

Pakalese nangi crafted | पाकने सपशेल नांगी टाकली

पाकने सपशेल नांगी टाकली

Next

कराची: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने एकतर्फी विजय मिळविला. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना पाकिस्तानमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. पाकमधील क्रि केट चाहत्यांच्यावतीने माजी कर्णधार आणि राजकीय नेते इम्रान खान यांनी संघाच्या खराब कामिगरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा हा पराभव वेदनादायी होता, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवरून व्यक्त केली. इम्रान खान म्हणाले, ‘जय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मान्य आहे. पण पाकने भारताविरु द्ध कुठलाही संघर्ष न करता सपशेल नांगी टाकली. त्यामुळे हा पराभव वेदनादायी असाच होता.’ पराभवानंतर इम्रान यांनी पाकिस्तान क्रि केट बोर्डातील कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. पाकिस्तान क्रि केटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र, ही सुधारणा होईपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाच्या स्तरातील अंतर आणखी वाढलेले असेल, अशी भीती इम्रान यांनी व्यक्त केली आहे. पाकच्या गोलंदाजांनी निराश केल्यानंतर फलंदाजांनी देखील भारतीय माऱ्यापुढे नांगी टाकल्याचे दिसले. अझहर अली आणि मोहम्मद हाफीज यांच्या खेळाचा अपवाद वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही.
>पाक संघामध्ये भारताला हरविण्याची क्षमता नाही
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी भारताविरुद्ध १२४ धावांनी पत्करावा लागलेला पराभव लाजिरवाणा होता, अशी प्रतिक्रिया वसीम अक्रम आणि पाकिस्तानच्या माजी इतर दिग्गज क्रिकेपटूंनी व्यक्त केली आहे. भारताने ३ बाद ३१९ धावांची मजल मारल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या या लढतीत पाकिस्तानचा डाव १६४ धावांत संपुष्टात आला.
माजी कर्णधार वसीम अक्रमच्या मते आयपीएल व क्रिकेटमध्ये अधिक गुंतवणूक करण्यात आल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. अक्रम म्हणाला, ‘अनेक बाबतीत आपण भारताच्या तुलनेत पिछाडीवर आहोत. आपल्याकडे बेदरकार खेळाडू तयार होत नाहीत. यापूर्वी प्रत्येक लढतीत उभय संघांना जिंकण्याची समान संधी असायची, पण रविवारी आपण गुडघे टेकविले. हा निराशाजनक पराभव होता.’
माजी कर्णधार राशिद लतिफ म्हणाले, ‘पाकिस्तानने पूर्ण १५ खेळाडू खेळविले असते तरी निकालामध्ये बदल झाला असता, असे मला वाटत नाही. उभय संघांदरम्यान आता फार मोठा फरक आहे.’
माजी कर्णधार आमिर सोहेल म्हणाला, ‘मीडियामध्ये बरीच हाईप होत असली तरी पाकिस्तानच्या संघामध्ये सध्याच्या भारतीय संघाला पराभूत करण्याची
क्षमता नाही.’
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संघर्ष न केल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना धारेवर धरले. शोएब म्हणाला, ‘इंग्लंडमधील वातावरणात कुठला संघ फिरकीने गोलंदाजीची सुरुवात करेल. भारताला पराभूत करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे त्यांना धावसंख्येत रोखणे हा आहे. त्यासाठी विकेट घेणे गरजेचे आहे. नव्या चेंडूने मात्र त्यांना थोपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्णधार व थिंक टँकचा हा निर्णय पचनी पडला नाही.’

Web Title: Pakalese nangi crafted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.